आता दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरत असाल तर...

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 जून 2021

दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरण्या नागरिकांना (Citizens) आता कारवाईला सामोरे जावे  लागणार आहे. 1 जून पासून दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

देशात(india) आता हेल्मेट(Helmet) सक्ती करण्यात आल्याने अनेकजण दुय्यम दर्जाच्या हेल्मेटचा वापर करत आहेत. आणि काहीजण बनावट (ISI)आयएसआय मार्क असलेल्या हेल्मेटची विक्री करत आहेत. बेकायदेशीर आयएसआय मार्क असलेल्या हेल्मेटची विक्री करत असाल किंवा खरेदी करत असाल तर तुमच्यावर देखील कारवाई (Action) होऊ शकते .बनावट (ISI)आयएसआय मार्क असलेला हेल्मेटची विक्रीही रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने (Central Government) हेल्मेट वापरासंबंधी नवे नियम(rules) लागू केले आहेत. दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरण्या नागरिकांना (Citizens) आता कारवाईला सामोरे जावे  लागणार आहे. 1 जून पासून दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.(Now if you are wearing a secondary grade helmet) 

''...अंमलबजावणी न झाल्यास'', केंद्र सरकारचा Twitter ला...   

आयएसआय (ISI) मार्क असलेले हेल्मेट आता दुचाकीस्वारांना बंधनकारक केले आहे. तुम्ही ज्या दुकानांमधून हेल्मेट खरेदी करत असाल तर नीट पाहणी करा.  हेल्मेट खरेदी करताना त्यावर (ISI) असणे आवश्यक आहे. मात्र आपल्या हेल्मेटवर आयएसआय मार्क नसेल आणि बीआयएस सर्टिफिकेशन(BIS Certification) नसेल तर आपल्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. तसेच 5 लाख रुपयांचा दंड (Penalty) आणि 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते. आयएसआय मार्क नसणाऱ्या आणि बनावट हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी आणि आयएसआय मार्क असलेले बनावट हेल्मेट बंद व्हावे, यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. येत्या काळात आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे अतिशय गरजेचे बनणार आहे. 

संबंधित बातम्या