आता सर्वोच्च न्यायालयही कोरोनाच्या विळख्यात; अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण  

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

देशभरात सुरू असलेल्या कोरोना साथीच्या आजाराने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  या कोरोनाच्या विळख्यात आता सर्वोच्च न्यायालयही आले आहे.  देशाच्या सर्वोच्च न्यायालयतील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. संसर्ग झालेल्यांपैकी बऱ्याच जणांचा थेट न्यायाधीशांच्या कार्यालयांशी संबंध आहे.  त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आता पुढील सर्व सूनवण्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.  

देशभरात सुरू असलेल्या कोरोना साथीच्या आजाराने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  या कोरोनाच्या विळख्यात आता सर्वोच्च न्यायालयही आले आहे.  देशाच्या सर्वोच्च न्यायालयतील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. संसर्ग झालेल्यांपैकी बऱ्याच जणांचा थेट न्यायाधीशांच्या कार्यालयांशी संबंध आहे.  त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आता पुढील सर्व सूनवण्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.  (Now the Supreme Court is also in the grip of Corona; Coronary infections in many employees) 

Board Exam 2021: मजुरांनंतर सोनू सूदने उठवला विद्यार्थ्यांसाठी आवाज

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात सुमारे 3400 कर्मचारी काम करतात. तर शनिवारी सर्वोच्च न्यायालयाच्या 44 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या खळबळजनक वृत्तानंतर सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ त्यांच्या ठरलेल्या वेळेपेक्षा एक तास उशीरा कामकाज सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारीही भारतात कोरोनाचे सुमारे 1 लाख 68  हजार इतकी नवीन रुग्णांची विक्रमी नोंद करण्यात आली.  त्याहीन धक्कादायक बाब महजे, देशात  मृत्यूची संख्याही भयावह आहे. केवळ सोमवारीच कोरोनामुळे देशभरात नऊशेहून अधिक लोक मरण पावले आहेत.

 

कोरोनाने भारतात गाठली धोकादायक पातळी
गेल्या आठवड्यात देशात दररोज सरासरी 1,24,476 नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली होती.  तर पहिल्या लाटेत, एका दिवसात जास्तीत जास्त 97 हजार पेक्षा जास्त प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या रविवारी 5  एप्रिल रोजी प्रथमच चोवीस तासांत देशात एक लाखाहून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यानंतर रविवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांत 1.52 लाख नवीन प्रकरणे समोर आली. या आठवड्यातील सात दिवसांपैकी सहा दिवसांत दररोज एक लाखाहून अधिक नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत,  जी आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.  सध्या, देशातील संक्रमणाचा वेग दुप्पट करण्याचा कालावधी 60.2 दिवस आहे आणि मृत्यूच्या दुप्पट होण्याचा कालावधी 139.5 दिवस आहे.

संबंधित बातम्या