''पोलिस तृणमुलच्या कार्यकर्त्यांना घाबरतायत'' राज्यपालांचा ममता सरकारवर निशाणा

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 मे 2021

मी त्यांच्यासाठी गोळी खाईन.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकांचा निकाल लागून जवळपास 12 दिवस लोटले आहेत. मात्र पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार (Jagdeep Dhankhar)  आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या नेतृत्वाखलचं सरकार यांच्यातील वाद थांबण्याची चिन्हं अद्याप काही दिसत नाहीत. राज्यपाल जगदीप धनखार यांनी पश्चिमबंगालमधील निवडणूकादरम्यान हिंसाचार झालेल्या कूचबिहारला गुरुवारी भेट दिली. त्यानंतर राज्यपाल धनखार यांनी बंगालमध्ये निर्माण झालेली परिस्थिती सांगताना ममता बॅनर्जी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. ‘’राज्यातले सामान्य नागरिक पोलिसांकडे जाण्यासाठी घाबरतात. राज्यातील पोलिस तृणमुल पक्षाच्या कार्यकर्त्यांना (Trinamool activists) घाबरत आहेत. मी पोलिसांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. मी त्यांना सांगितलं आहे की, मी त्यांच्यासाठी गोळी खाईन,’’ असं जगदीप धनखार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. (Police intimidate Trinamool activists Governor Mamata targets government)

'' जर लसीचं नसतील तर आम्ही फाशी घ्यायची का?'' केंद्रीय...

दरम्यान, यावेळी ‘’राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी वाद टाळायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील परिस्थिबद्दल मी सकारात्मक दृष्टीकोनातून बोलत आहे. त्यांना बंगालच्या जनतेचा कौल मिळाला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांशी थेट वाद टाळायला हवा,’’  असं राज्यपाल जगदीप धनखार म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांनी तृणमुल कॉंग्रेसने सगळे अंदाज खोटे ठरवत तब्बल 231 जागा जिंकल्या. तर मोदींच्या भाजपला अवघ्या 77 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. ममता बॅनर्जी यांनी 10 मे रोजी 43 मंत्र्यासोबत शपथ घेतली. याहीवेळी राज्याचे राज्यापाल जगदीप धनखार  आणि ममता बॅनर्जी यांचे वितुष्ट समोर आलं होतं.

संबंधित बातम्या