लॉकडाऊनमध्ये भारतात गरिबी वाढली

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

 कोरोनाव्हायरसच्या जागतिक साथीच्या काळात भारतासह जगातील श्रीमंतांची संपत्ती वाढल्याचे निरीक्षण ‘ऑक्सफाम’ या संस्थेच्या ‘द इनइक्वॉलिटी व्हायरस’ या अहवालात नोंदविले आहे.

नवी दिल्ली: कोरोनाव्हायरसच्या जागतिक साथीच्या काळात भारतासह जगातील श्रीमंतांची संपत्ती वाढल्याचे निरीक्षण ‘ऑक्सफाम’ या संस्थेच्या ‘द इनइक्वॉलिटी व्हायरस’ या अहवालात नोंदविले आहे. श्रीमंताच्या चकचकाटाच्या दुसऱ्या बाजुला मात्र देशातील अनेक कुटुंबे गरिबीत लोटली आहेत, हेही यात दाखवून दिले आहे. असंघटित क्षेत्र, शिक्षण, आरोग्‍य आदी क्षेत्रांबरोबर महिलांवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला. कोरोनाव्हायरसच्या जागतिक साथीच्या काळात भारतासह जगातील श्रीमंतांची संपत्ती वाढल्याचे निरीक्षण ‘ऑक्सफाम’ या संस्थेच्या ‘द इनइक्वॉलिटी व्हायरस’ या अहवालात नोंदविले आहे.

रशियावर नव्याने निर्बंध लादण्याबाबत युरोपीय महासंघ करणार चर्चा -.

आरोग्य :
  कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेला भारत हा जगातील दुसरा देश 
  गरीब, असुरक्षित समाजात कोरोनाच्या संसर्गाचा वेग जास्त. 
रोजगार :
  असंघटित रोजगार क्षेत्रात असलेल्या ७५ टक्के जनतेला सर्वाधिक फटका. 
  १२ कोटी २० लाख रोजगारावर गदा. 
  अशा क्षेत्रात घरून काम करण्याची संधी फारशी नाही. 
  बांधकाम, कारखाने आदी ठिकाणी हंगामी काम करणारे चार ते पाच कोटी मजूर भरडले गेले. 

शिक्षण :
  गेल्या वर्षभरात प्रत्यक्षकडून ऑनलाइन असा प्रवास. 
  शैक्षणिक क्षेत्रातील डिजिटल स्थलांतराने असमानतेत भर 
  दुसऱ्या बाजूला देशात २० टक्के गरिबांपैकी तीन टक्के कुटुंबांमध्ये संगणक तर नऊ टक्के घरांत इंटरनेटची सोय

कोरोना-व्हायरसच्या साथीने सर्वांना समान पातळीवर आणल्याचे सुरुवातीला दिसले तरी लॉकडाउनच्या अंमलबजावणीनंतर समाजात असमानतेची दरी अधिक रुंदावल्याचे दिसते. 
- अमिताभ बेहर, मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑक्सफाम, भारत 

श्रीमंत व गरिबांमधील वाढत गेलेली असमानता ही कोरोना विषाणू-प्रमाणेच घातक ठरत आहे. 
- गॅब्रिएला बुचर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यकारी संचालक, ऑक्सफाम 
 

संबंधित बातम्या