व्हिक्टोरिया हॉलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते

Prime Minister Modi will inaugurate the main program that will be organised to mark the birthday celebration of Netaji Subhash Chandra Bose
Prime Minister Modi will inaugurate the main program that will be organised to mark the birthday celebration of Netaji Subhash Chandra Bose

नवी दिल्ली :  कोलकाता येथील व्हिक्टोरिया हॉलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याची माहीती केंद्रीय संस्कृती मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी  ट्विटद्वारे दिली आहे.

भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती इथून पुढे प्रत्येक वर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. "नेताजी हे भारताचे स्वतंत्र्यसेनानी होते. आम्ही या घोषणेचे स्वागत करतो पण लोक 23 जानेवारीला 'देशप्रेम दिवा' म्हणून साजरे करत आहेत, जर सरकारने ते देशप्रेम दिवस म्हणून जाहीर केलं असतं तर अधिक योग्य ठरलं असतं, परंतु आम्ही या घोषणेबद्दल आनंदी आहोत”, अशी प्रतिक्रिया नेताजी सुभाष चंद्र यांचे पणतू आणि भाजपचे नेते सी के बोस यांनी दिली.  

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेली ही समिती  23 जानेवारी 2021 पासून सुरू होणाऱ्या या निर्णय घेणार आहे. समितीच्या सदस्यांमध्ये तज्ज्ञ, इतिहासकार, लेखक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबीय तसेच आझाद हिंद फौज-आयएनएशी संबंधित नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. 

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com