"तुघलकी लॉकडाऊन लावा, घंट्या वाजवा" हीच सरकारची कोरोनाविरुद्धची रणनीती

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

कोरोना काळातील परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या कोरोना काळातील रणनीतीवर राहुल गांधी यांनी टीका आहे.

कोरोना विषाणूच्या संक्रमणाला पुन्हा वेगाने सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. देशात आज दुसऱ्यांदा २ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संक्रमणामुळे सध्या देशात निर्माण झालेल्या परिस्थतीमुळे पुन्हा देशभरात लॉकडाऊन लागण्याच्या शक्यता वाढताना दिसता आहेत. कोरोना काळातील परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या कोरोना काळातील रणनीतीवर राहुल गांधी यांनी टीका आहे. (Rahul Gandhi has criticized the central government's strategy against Corona.)

पर्यटकांनो जरा थांबा! केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती अधिकच चिंताजनक होत जाताना दिसते आहे. यावर केंद्र सरकार वेगवगेळ्या प्रकारचे निर्णय घेऊन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत असताना दिसते आहे. त्यातच राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी पहिल्या लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nanrendra Modi) यांनी देशातील जनतेला थाळ्या आणि टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यावर टीका करताना राहुल गांधी ट्विट करत लिहिले की   "पहिल्यांदा तुघलकी लॉकडाऊन लावा, त्यानंतर घंटी वाजवा आणि मग देवाचे गुणगान गा"हीच कोरोना (Corona)विरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारची रणनीती असल्याची टीका केली आहे. 

दरम्यान, पाच राज्यातील निवडणूका, कुंभ मेळा (kumbh Mela) आणि इतर ठिकाणी होणाऱ्या मोठ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाताना दिसते आहे. देशातील अनेक राज्यांत अंशतः लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू चे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर महाराष्ट्रात कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे १५ दिवसांचा लोकडाऊन लागू करण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या