राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

दैनिक गोमंतक
मंगळवार, 20 एप्रिल 2021

देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सर्वसामान्य नगरिकापासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यापर्यंत सर्वचजण कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. आता राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सर्वसामान्य नगरिकापासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यापर्यंत सर्वचजण कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. आता राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना  देखील कोरोना तपासणी करण्याचे आवाहन राहुल गांधी गांधी यांनी केले आहे. या काळात ते घरातच विलगीकरणायात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, देशभरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल मध्ये असणाऱ्या आगामी काळातील आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Rahul Gandhi infected with corona) 

केंद्र सरकारचा मोठा निर्णय: 18 वर्षावरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती  आहे. त्यांनी स्वतःला घराच्या विलगीकरणात ठेवले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसुद्धा विलगीकरणात आहेत. काही दिवस ते घरतूनच काम करणार आहेत.  तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  दरम्यान कोरोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं होता.  त्यात त्यांनी देशात लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्याबाबत, विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर लस पुरवठ्यास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलण्यात यावीत अशी सूचना देखील केली आहे.

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात पाच कलमी कार्यक्रमाचा उल्लेख केला होता.
1 पुढील पाच महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर देण्यात आली आहे ते जाहीर करावे. 2 राज्यांना आपेक्षित असलेला साठा कसा परवला जाईल याचे संकेत देण्यात यावेत. 3 राज्यांना फ्रंटलाईन वर्कसची श्रेणी  ठरवण्यासाठी सूट देण्यात यावी. 4 लस निर्मिती कंपन्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी सूट देण्यात यावी. 5 वापरासाठी परवानगी दिल्या गेलेल्या कोणत्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी या पाच मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या