राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका वाचा काय म्हणाले

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाने  बिघडलेल्या परिस्तिथीमुळे केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाने  बिघडलेल्या परिस्तिथीमुळे केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय . राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून सरकारवर निशाना साधला आहे, ना कोरोनावरती काबू , ना पर्याप्त लसीकरण, ना रोज़गार, ना शेतकरी आणि मजुरांवरती लक्ष, ना एमएसएमई सेफ, ना मध्यमवर्ग संतुष्ट, आम खाना ठीक था, आम जन को तो छोड़ देते अशी घणाघाती टीका राहूल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे. देशातील कोरोनाच्या बिघडत्या परिस्तिथी वरून अनेक विपक्षी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.(Read what Rahul Gandhi said about Narendra Modi)

भारतात कोरोनाचा विस्फोट ;24 तासात 1.52 लाख रुग्ण, 839 जणांचा मृत्यू

देशात सध्या कोरोनाचे आकडे झपाट्याने वाढत आहेत. दररोजच्य  दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. अनेक राज्ये लसीकरणाच्या कमतरतेमुळे प्रश्न उपस्थित करीत आहेत.  गेली अनेक महिने झालं शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. याशिवाय ढासळणारी अर्थव्यवस्था आणि रोजगाराची समस्याही चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. यासह राहुल गांधींनी आंबे खाण्याचा देखील उल्लेख केला आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षर कुमार याला दिलेली  राजनैतिक मुलाखत बरीच चर्चेत आली होती. आताच्या परिस्थितीत त्याचा उल्लेख करून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, देशात सध्या कोरोनाचे आकडे वाढत आहेत. त्याचबरोबर लसींचा पुरवठाही कमी होतोय. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे  मजूर आणि सर्वसामान्य कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे. देश पुन्हा एकदा लॉकडाऊन दिशेने झुकतो का याची भीती सर्वसामान्य लोकांना आहे. याच परिस्थितीचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.   
 

संबंधित बातम्या