न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कुणाल कामरा आणि रचिता तनेजाला कारणे दाखवा नोटीस

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

न्यायालय आणि न्यायाधीशांविरोधात केलेल्या ट्विटबद्दल भारतीय सर्वोच्च न्यायालय व्यंगचित्रकार रचिता तनेजा आणि स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या बाबतीत न्यायालय आणखी कठोर निर्णय घेतांना दिसत आहे.

नवी दिल्ली: न्यायालय आणि न्यायाधीशांविरोधात केलेल्या ट्विटबद्दल भारतीय सर्वोच्च न्यायालयने कुणाल कामरा आणि रचिता तनेया यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. व्यंगचित्रकार रचिता तनेजा आणि स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या बाबतीत न्यायालय कठोर निर्णय घेतांना दिसत आहे.

कुणाल कामरा आणि रचिता तनेया यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात होणारी ही कारवाई आणि प्रकरण का हाताळलं जाऊ नये? याबाबत त्यांना उत्तर देण्यास न्यायालयाने त्यांना दिड महिन्याचा कालावधी दिला आहे.

या कारवाईदरम्यान कुणाल आणि रचिता या दोघांनाही वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही असंही सांगण्यात आलं आहे. न्यायाधीश अशोक भूषण, न्यायमूर्ती आर. एस. रेड्डी आणि एम.आर. शाह यांच्या समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं या प्रकरणी निर्णय सुनावला आहे. गुरुवारी याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयानं हा निर्णय शुक्रवारसाठी राखून ठेवला होता.

आणखी वाचा:

दिल्ली विधानसभेत केजरीवालांकडून कृषी कायद्यांच्या चिंध्या -

 

संबंधित बातम्या