...म्हणून इस्रोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र व भगवद्गीता अवकाशात पाठविली   

ISRO
ISRO

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) आज श्रीहरिकोटा येथून पी.एस.एल.वी.-सी 51(PSLV- C51) या प्रक्षेपकाद्वारे अ‍ॅमेझोनिया वन आणि 18 उपग्रह अवकाशात पाठवले. पी.एस.एल.वी.-सी 51 च्या माध्यमातून ब्राझीलच्या अ‍ॅमेझोनिया वन मधील अ‍ॅमेझोनिया प्रायमरी सॅटेलाईट आणि 18 उपग्रहांचे प्रक्षेपण आज करण्यात आले. हे अवकाश अभियान भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असताना दुसरीकडे या प्रक्षेपणाची खास बाब म्हणजे इस्त्रोने पीएसएलव्ही-सी 51 रॉकेटच्या सहाय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र आणि भगवद्गीता यांना अवकाशात पाठवले आहे.  

इस्रोने आपल्या सतीश धवन उपग्रहाच्या शीर्ष पॅनेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र कोरले आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत या उपक्रम आणि खासगी क्षेत्राच्या अंतराळात जाण्याचा मार्ग खुला करण्याच्या निर्णयाशी एकता दाखवण्यासाठी म्हणून इस्रोने नरेंद्र मोदी यांचे चित्र अवकाशात पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे जेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या आत्मनिर्भर भारत या उपक्रमाचे कोरलेले नाव आणि प्रधानमंत्री यांचा फोटो अवकाशात पाठवण्यात आला आहे. 

याव्यतिरिक्त, इस्रोसाठी स्पेस किड्स इंडियाने हा उपग्रह विकसित केला आहे. स्पेस किड्स इंडिया या उपग्रहाद्वारे अवकाशातील किरणोत्सर्गावर संशोधन करणार आहे. त्यानंतर भगवद्गीता देखील अवकाशात पाठविण्यात आली आहे. भगवद्गीताला अवकाशात पाठविण्याची कल्पना स्पेस किड्स इंडियाच्या सीईओ डॉ. श्रीमती केसन यांनी दिली होती. त्यांच्या मते, जगातील अन्य महत्वाच्या अवकाश  मोहिमांमध्ये आपले पवित्र ग्रंथ अवकाशात पाठविण्याची प्रथा आहे. यापूर्वी अनेकवेळा बायबलला अवकाशात पाठविण्यात आले आहे. मात्र भारतात असे पूर्वी कधीच झाले नसल्यामुळे भारत देखील इतिहास घडवेल या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, 637 किलो वजनाचा अ‍ॅमेझोनिया-1 हा ब्राझीलचा पहिला उपग्रह असून तो भारतातून प्रक्षेपित करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेचा (आयएनपीआय) ऑप्टिकल पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे.अ‍ॅमेझोनिया-1 संदर्भात इस्रोने एका निवेदनात म्हटले आहे की उपग्रह अ‍ॅमेझॉन  प्रदेशातील जंगलतोड व ब्राझिलियन प्रदेशातील विविध शेतीच्या विश्लेषणासाठी रिमोट सेन्सिंग डेटा प्रदान करेल आणि विद्यमान पायाभूत सुविधा आणखी मजबूत करेल. यासोबतच भारताने प्रक्षेपित केलेल्या परदेशी उपग्रहांची एकूण संख्या आता 342 झाली आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com