Sonia Gandhi's letter to Modi: Drugs on myocardial infarction should be made available in the market immediately 
Sonia Gandhi's letter to Modi: Drugs on myocardial infarction should be made available in the market immediately 

म्यूकरमाइकोसिसवरील औषधे त्वरीत बाजारात उपलब्ध करुन द्यावीत : सोनिया गांधींचे मोदींना पत्र

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) संक्रमणासोबत आता म्यूकरमाइकोसिसच्या (Mucormycosis) आजारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याबाबत कॉंग्रेस आध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्यूकरमाइकोसिसला आयुष्मान भारत यासह आणखीन एका आरोग्य विमा अंतर्गत घेण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर यावरील लिपोसोमल एंफोटेरिसिन (Liposomal Amphotericin-B) या औषधाची सध्या बाजारात कमतरता असून, सरकारने लिपोसोमल एंफोटेरिसिन हे औषध त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावे असेही सोनिया गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे. (Sonia Gandhi's letter to Modi: Drugs on myocardial infarction should be made available in the market immediately) 

भारत सरकारने राज्य सरकारांना म्यूकरमाइकोसिसला महामारी घोषित करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ या रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा त्याचे वाटप आणि या रोगाचा मोफत उपचार करणे आवश्यक आसते. त्यामुळे या रोगाने ग्रस्थ झालेल्या रुग्णांसाठी सरकारने त्वरीत पावले उचलणे गरजेचे आहे. हा रोग कोरोनातून बरे झालेल्यांना होत आसल्याचे समोर आले आहे. कोरोना झालेल्या रुग्णांनी याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे दृष्टी जाण्याचा धोका सुद्धा आहे. फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) सारख्या या आजाराचा धोका मधुमेह, एचआयव्ही सरख्या रुग्णांना तसेच केमोथेरेपी सुरु आसलेल्या रुग्णांना जास्त आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com