''राज्यांकडे लसीची कमरता नाही'';केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा

दैनिक गोमंतक
गुरुवार, 29 एप्रिल 2021

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस उपलब्ध आहेत

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस उपलब्ध आहेत आणि येत्या तीन दिवसांत सर्व राज्यांना 57,70,000  लस मिळणार आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले.   केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना  विनामूल्य 15,95,96,140 एवढे लसीचे डोस  दिले आहेत. यापैकी, खराबी झालेल्या लसींचा आकडा कमी केला तर 14,89,76,248 एवढ्या लसींचे डोस टोचले आहेत. अलीकडेच काही माध्यमांनी महाराष्ट्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले होते की राज्यात लसींचे डोस संपले आहेत.  ज्याचा राज्यात लसीकरण अभियानावर विपरीत परिणाम होत आहे असे मंत्रालयाने म्हटले.("States do not have a shortage of vaccines"; claims the Union Ministry of Health)

गुजरातमध्ये 1000 खाटांचे कोविड सेंटर उभारणार; रिलायन्स फाउंडेशनची घोषणा 

''महाराष्ट्रात लसांची कमतरता नाही''
मंत्रालयाने स्पष्टीकरण देताना म्हणाले महाराष्ट्राला  २८  एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत कोरोनाच्या लसींचे १,५८,६२,४७० एवढे  डोस महाराष्ट्रात देण्यात आले. यापैक ०.२२ टक्के  डोस खराब झाले . 1,53,56,151 एवढ्या लसी टोचल्या गेल्या. राज्यात सध्या 5,06,319 एवढे डोस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पुढील तीन दिवसांत आणखी 5,00,000 लस महाराष्ट्रात पाठवल्या जातील.

दिल्लीत किती लस शिल्लक 
दिल्लीत 36,90,710 एवढ्या लसी आल्या होत्या. त्याचबरोबर, खराब झालेल्या लसी सोडल्या तर एकूण 32,43,300  लसींचे डोस नागरिकांना दिले गेले आहेत. सध्या त्यांच्याकडे 4,47,410 लस उपलब्ध आहेत आणि 1,50,000 लस देण्यात येणार आहेत. राजस्थानमध्ये आतापर्यंत 1,36,12,360 लस देण्यात आल्या आहेत. राज्यात आता 3,92,002 लस उपलब्ध आहेत आणि 2,00,000 लस पुरविल्या जातील. पश्चिम बंगालला 1,09,83,340 लस देण्यात आल्या असून आता 2,92,808 लस उपलब्ध आहेत आणि 4,00,000 लस देण्यात आल्या आहेत.

अन्य राज्यांकडे उपलब्ध असलेला साठा 
उत्तर प्रदेश -12,92,837 
कर्नाटक- 3,46,685
छत्तीसगड- 3,38,963 

 

संबंधित बातम्या