गुजरातमध्ये 1000 खाटांचे कोविड सेंटर उभारणार; रिलायन्स फाउंडेशनची घोषणा 

रिलायन्स फाउंडेशन.jpg
रिलायन्स फाउंडेशन.jpg

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य यंत्रणांवरील ताणही प्रचंड वाढला आहे. महाराष्ट्रासह, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.  रुग्णांना बेडस, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाहीयेत. अशात रिलायन्स फाउंडेशनने  गुजरातमधील जामनगरमध्ये ऑक्सिजनसह एक हजार खाटांचे  कोविड केअर सेंटर उभारणार असल्याची घोषणा केली आहे.  विशेष म्हणजे याठिकाणी रुग्णांना सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहेत. सुविधा उभारणे व चालविणे यासाठी संपूर्ण खर्च रिलायन्स समहू करणार आहे.  (To set up 1000-bed covid Center in Gujarat; Reliance Foundation announcement)

एका आठवड्यातच जामनगरमधील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात 400 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले जाईल. त्यानंतर येत्या दोन आठवड्यांत जामनगरमधील अन्य एका  ठिकाणी 600 खाटांचे दुसरे कोविड केअर सेंटर सुरू केले जाईल, अशीही माहिती समोर आली आहे.  त्याचबरोबर, रिलायन्सकडून सर्व आवश्यक कर्मचारी, वैद्यकीय मदत, वैद्यकीय उपकरणे, इतर डिस्पोजेबल वस्तू उपलब्ध करुन देण्यात येतील. तर डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या तैनाती राज्य सरकार करणार आहे. जामनगर हे एक मोठे शहर आहे, म्हणून जवळील जिल्ह्यातील रुग्णहीउपचारसाठी याठिकाणी जात आहेत. जामनगरव्यतिरिक्त खांभलिया, द्वारका, पोरबंदर आणि सौराष्ट्रसह इतर भागात राहणाऱ्यानाही दिलासा मिळणार आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी याबाबत माहिती दिली आहे.  "भारत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी लढा देत आहे आणि आम्ही सर्व प्रकारे मदत करण्यास वचनबद्ध आहोत. अतिरिक्त आरोग्य सुविधांची गरज या क्षणी आहे. रिलायन्स फाउंडेशन गुजरातमधील जामनगरमध्ये 1000 खाटांचे ऑक्सिजनची उपलब्धता असलेले  कोविड सेंटर सुरू करेल.  यात 400 खाटांचे हे सेंटर एका आठवड्यात तयार होईल आणि दुसर्‍या आठवड्यात आणखी 600 खाटांचे केंद्र सुरू होईल. हे रुग्णालय विनामूल्य उपचार देईल. कोरोना महामारीच्या सुर्वतीपासूनच रिलायन्स फाउंडेशन सर्व भारतीयांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे. अमूल्य जीव वाचविण्यासाठीयांचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते सुरूच राहतील. आपण सर्वजण एकत्रितपणे कोरोनाला पराभूत करू आणि ही लढाई जिंकू, असे नीता अंबानी यांनी म्हटले आहे. 

 रिलायन्स फाऊंडेशनने  गुजरातच्या अगोदर महाराष्ट्रातही कोविड केअर सेंटर उभारण्याची घोषणा केली होती. रिलायन्स फाऊंडेशन मुंबईतील विविध ठिकाणी एकूण 875 बेडचे कोविड सेंटरची व्यवस्था करत आहे.  गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण 1875 बेडसचे कोविड केअर सेंटर रिलायन्स फाऊंडेशन संचालित करणार आहे. याशिवाय रिलायन्स कोविड बाधित राज्यांना 1000 मे.टन ऑक्सिजन विनामूल्य पाठवित आहे. एवढ्या ऑक्सिजनमुळे दररोज 1 लाखाहून अधिक कोविड रुग्णांची गरज भागविली जाईल, असेही नीता अंबानी यांनी म्हटले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com