निधन झाल्याचं ट्विट करणाऱ्यांवर सुमित्रा महाजन भडकल्या...

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

माझ्या नातेवाईकांनी शशी थरुर यांना निधनाची बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे.

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) या गुरुवारी रात्री चर्चेचा विषय ठरल्य़ा आहेत. यामागचं कारण मात्र आश्चर्यचकीत करणारं आहे. सुमित्र महाजन यांचं निधन झालं असल्याची बातमी वेगाने पसरली होती. कॉंग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरुर यांनी ट्विट करत सुमित्र महाजन यांना श्रध्दांजली वाहिली. आणि सगळीकडे त्यांच्या निधनाच्या बातमीची चर्चा सुरु झाली. ट्विट करण्यात फक्त शशी थरुरचं (Shashi Tharoor) नव्हते तर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही ट्विट केलं होतं. मात्र ही बातमी असत्य असल्याचं लक्षात आल्यांनंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. मात्र यामुळे सुमित्र महाजन  हा प्रकार पाहून चागल्यांच संतापल्या.

''पंतप्रधान साहेब तुम्ही फोन करा म्हणजे दिल्लीला ऑक्सिजन मिळेल"

माझं निधन झाल्याचं जाहीर करण्यात एवढी कसली घाई झाली होती अशी विचारणा सुमित्रा महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केली. इंदूर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पडताळणी न करताच काही माध्यमांनी माझ्या निधनाची बातमी कशी काय चालवली? माझ्या नातेवाईकांनी शशी थरुर यांना निधनाची बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. परंतु पुष्टी करण्याआधीच जाहीर करण्याची इतकी कसली घाई होती?” अशी विचारणा सुमित्रा महाजन यांनी केली आहे.

दरम्यान शशी थरुर यांनी ट्विट डिलीट करत जाहीर मागितली आहे. आपण सुमित्रा महाजन यांच्य़ा मुलाशी बोलून माफी मागितली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.
 

संबंधित बातम्या