संयुक्त किसान मोर्चाकडून ट्रॅक्टर परेड रद्द; तर आंदोलन शांततेत सुरूच राहणार  

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी आज दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे नियोजन केले होते. मात्र शेतकऱ्यांनी काढलेल्या या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले.

नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी आज दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे नियोजन केले होते. मात्र शेतकऱ्यांनी काढलेल्या या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. आणि त्यानंतर आता संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) प्रजासत्ताक दिनादिवशी आयोजित करण्यात आलेली ही ट्रॅक्टर परेड रद्द केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने तातडीने ट्रॅक्टर रॅली मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, सर्व सहभागी आंदोलनकर्त्यांना निषेधाच्या ठिकाणी परत जाण्याचे आवाहन केले आहे. 

''ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान घडलेल्या हिंसक घटनेशी आमचा संबंध नाही...

प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे नियोजन केले होते. मात्र काही ठिकाणी या रॅलीला हिंसक वळण लागून दिल्ली पोलीस आणि आंदोलन करणाऱ्यांमध्ये चकमक झाली. शिवाय पोलीस आणि आंदोलकर्ते यांच्यातील झटापटीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.  पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सवर ट्रॅक्टर धडकवल्यानंतर हा ट्रॅक्टर पलटी झाला होता. व यातच या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले काही वेळापूर्वी म्हटले होते. या संपूर्ण घटनाक्रमानंतर संयुक्त किसान मोर्चाने ट्रॅक्टर परेड स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त किसान मोर्चाने किसान प्रजासत्ताक दिन परेड तत्काळ प्रभावीपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

संयुक्त किसान मोर्चाने ट्रॅक्टर रॅली रद्द करतानाच, शेतकरी आंदोलन कर्त्यांना आपापल्या पूर्वस्थळी परत जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलन शांततेत सुरूच राहणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. आणि पुढील चरणांवर लवकरच चर्चा करून, आगामी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे.      

संबंधित बातम्या