Delhi Tractor Parade: लाल किल्ल्यावर फडकला शेतकरी आंदोलनाचा ध्वज

Tractor parade in Delhi Farmers reached red fort and hoisted the protest flag
Tractor parade in Delhi Farmers reached red fort and hoisted the protest flag

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आज अभूतपूर्व गोंधळ होत, हिंसक वळण लागले. तरी, "शेतकरी आंदोलन शांततामय मार्गानेच सुरू सुरु राहिल. मोर्चाची सांगता शांततेत होऊन शेतकरी माघारी परततील. शेतकऱ्यांची संख्या बघता रिंग रोडची परवानगी द्यायला हवी होती. शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनात कोणतीही हिंसा होणार नाही", असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं. आणखी अनुचित प्रकार घडू नये याकरिता दिल्लीतील आठ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड सुरु आहे.

ट्रॅक्टर परेडला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांनी निश्चित वेळेच्या आणि ठरवून दिलेल्या मार्गांपेक्षा इतर ठिकाणांच्या मार्गाहून परेड नेण्याचा प्रयत्न केला. आंदोलक शेतकऱ्यांनी आपला नियोजित मार्ग बदलत थेट लाल किल्ला गाठला. पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो आसफल झाल्याने अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील नागलोई येथे पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी त्यांचं ऐकण्यास तयार नव्हते. म्हणून अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी एकत्र येत रस्त्यावरच बैठक मारली. शेतकऱ्यांनी सर्व ठिकाणांवर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून दिल्लीतील सीमेत निश्चित वेळेच्या आधीच जाण्यास सुरवात केली. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत दाखल झाले. अशीच परिस्थिती गुरुग्राम, फरिदाबादमध्येही दिसली. संतप्त शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर येथे अश्रूधुराचा वापर केला असून गाझीपूर येथे लाठीचार्जही करण्यात आला आहे.

62 दिवसांच्या आंदोलनानंतरही तोडगा निघत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेले दिसले. शेतकऱ्यांची  'किसान गणतंत्र परेड'  म्हणजेच ट्रॅक्टर परेड परवानगी नसताना मध्यवर्ती दिल्लीत घुसली. आंदोलन रोखण्याचा अटोकाट प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, आंदोलन रोखण्यात पोलिसांना अपयश आले.याआधी,नोएडा सीमेवर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा केला. मुबारका चौकात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, त्यामुळे लाठीचारासह अश्रुधुराचा वापर करण्यात आला.आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्ली-हरयाणाच्या टिकरी बॉर्डरवरचे पोलिस बॅरिकेडींग तोडले आहेत. दरम्यान, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या परेडच्या आयोजनावर टीका करत ते म्हणाले, “शेतकऱ्यांना 26 जानेवारी ऐवजी इतर कोणत्याही दिवसाची निवड करता आली असती, परंतु त्यांनी हाच दिवस निवडला. शेतकर्‍यांची ही रॅली शांततेत पार पडेल, याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. कारण पोलिस प्रशासनासाठी देखील चिंताजनक बाब आहे.” पोलिसांकडून नांगलोईमध्ये रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी मध्य दिल्लीत प्रवेश करण्.चा प्रयत्न केल्यास, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं होतं. आता आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com