Farmers Protest : हिंसक घटनेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

केंद्राने बनवलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांमध्ये फूट पडली आहे. कृषी विधेयकाच्या आंदोलनासाठी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसा घडल्यानंतर शेतकऱ्यांच्या दोन संघटनांनी आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्राने बनवलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांमध्ये फूट पडली आहे. कृषी विधेयकाच्या आंदोलनासाठी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसा घडल्यानंतर शेतकऱ्यांच्या दोन संघटनांनी आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय किसान युनियन (भानु) या शेतकरी संघटनेने शेतकरी आंदोलनातून पाठिंबा काढून घेत चिल्ला सीमेवरुन माघार घेण्याची घोषणा केली आहे. तर त्यानंतर राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने देखील या आंदोलनातून माघार घेत असल्याचे म्हटले आहे. 

भारतीय किसान युनियनचे (भानु) ठाकूर भानू प्रताप सिंग यांनी आज नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनातून माघार घेण्याची घोषणा केली. प्रजासत्ताक दिनादिवशी ट्रॅक्टर परेडच्या वेळेस घडलेल्या हिंसक घटनेनंतर आपण दुःखी झाल्याचे ठाकूर भानू प्रताप सिंग यांनी आज म्हटले आहे. व यामुळे मागील 58 दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा त्यांनी केली. यानंतर राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने देखील तीन नवीन शेती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा पाठिंबा काढून घेतला आहे.    

Delhi Tractor Parade Violence "शेतकऱ्यांच्या हिंसेला दिल्ली पोलिसच जबाबदार...  

राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते सरदार व्हीएम सिंह यांनी ते स्वतः आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटना आंदोलनातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्रॅक्टर परेड दरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे व्हीएम सिंह यांनी म्हटले आहे. शेतकरी नेते सरदार व्हीएम सिंह यांनी, "मी अशा लोकांसोबत आंदोलन करू शकत नाही ज्यांची आंदोलनाची दिशा वेगळी आहे. म्हणूनच मी त्यांना शुभेच्छा देतो. तसेच मी प्रवक्ते राकेश टिकैत यांचे प्रतिनिधित्व करत आहे," असे ते म्हणाले. 

याशिवाय, हिंसाचारामुळे आपणाला खूप दु:ख झालेअसून, आम्ही शांततेत आंदोलन करण्यासाठी आलो होतो. पण लोकांनी ज्या प्रकारे हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला, तो फार वाईट असल्याचे व्ही. एम. सिंह म्हणाले. यानंतर जोपर्यंत एमएसपीची हमी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, परंतु आपल्याकडून आता हे आंदोलन पुढे जाणार नसल्याचे व्ही. एम. सिंह यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या