27 जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 स्थगित; 'या' दिवशी होणार परीक्षा 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

देशात कोविड -19 (Covid-19)  विषाणूची लाट झपाट्याने वाढत असून देशभर चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.  देशातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांसह धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली  आहे.

देशात कोविड -19 (Covid-19)  विषाणूची लाट झपाट्याने वाढत असून देशभर चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.  देशातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांसह धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली  आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये यांसह स्पर्धा परिक्षाही  रद्द करण्यात आल्या आहेत. याच  पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची 27 जून 2021 रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC Exam)  10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. ढकलण्यात आली आहे. या संदर्भात, अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे. आता ही परीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटिसांची तपासणी करू शकतात. (UPSC exam 2021 scheduled for June 27 postponed) 

लहान मुलांवर कोव्हॅक्सिनच्या ट्रायलला DCGIकडून  मंजूरी  

जारी केलेल्या सूचनेनुसार, "कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे (covid-19) केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 स्थगित केली आहे, ही परीक्षा 27 जून, 2021 रोजी होणार होती. आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.  सोशल मीडियावरील विद्यार्थ्यांकडून परीक्षा बऱ्याच काळापासून तहकूब करण्याची मागणी केली जात आहे. गेल्या वर्षीदेखील कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे नागरी सेवा परीक्षा 31 मे रोजी होणारी परिसखा स्थगित करून ती 4 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. दरम्यान यापूर्वीदेखील आयोगाने  कांबाइन वैद्यकीय परीक्षा व इतर परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत, त्यांनी कोणतीही अद्यतने मिळविण्यासाठी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर लक्ष ठेवण्याची   सूचना देण्यात आली आहे. 

दरम्यान, 2020 मध्ये देशात कोरोना साथीच्या साथीमुळे राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन झाल्यामुळे नागरी सेवा पूर्व  परीक्षा 2020 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यावर्षी 712 आणि भारतीय वन सेवा परिक्षेत 110 जागा रिक्त आहेत. या परीक्षा अनेक परीक्षा केंद्रांवर घेतल्या जातील. विशेष म्हणजे  वयोमर्यादा ओलंडणाऱ्या उमेदवारांसाठी  एकदा अतिरिक्त संधी देण्याचे केंद्रसरकारने  मान्य केले आहे. तसेच,  ही अतिरिक्त संधी केवळ त्यांच्यासाठी आहे ज्यांना सीएसई 2020 मध्ये बसण्याची शेवटची संधी होती.  केवळ या उमेदवारांनाच वयोमर्यादेमध्ये सवलत मिळेल, ते सीएसई 2021 साठी वैध असतील. जे परीक्षेत भाग घेण्याची शेवटची संधी गमावणार नाहीत त्यांना नागरी सेवा परीक्षा 2021 मध्ये बसण्याची अतिरिक्त संधी दिली जाणार नाही.

संबंधित बातम्या