भाजी 1 लाख रुपयाला किलो; शेतकरी मालामाल

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

हॉप शूट्स या भाजीला एवढी किंमत येण्यामागील कारण म्हणजे या वनस्पतीमध्ये दोन खास प्रकारची अ‍ॅसिड आहेत.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बिहारमधील एक तरुण शेतकरी चक्क एक लाख रुपये प्रति किलो भाजीचं उत्पादन घेत आहे. एक लाख रुपये प्रति किलो भाजी म्हटल्यांनतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. मात्र याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील या तरुण शेतकऱ्याने प्रायोगिक तत्वावर या भाजीची लागवड केली आहे. या भाजीचं नाव आहे 'हॉप शूट्स'. खरं तर या भाजीचं उत्पादन 11 व्या शतकामध्ये घेण्यात आलं होतं. त्या काळात या वनस्पतीचा वापर बियरमध्ये प्लेवर आणण्यासाठी वापर केला जायचा. त्यानंतरच्या काळामध्ये या भाजीचा वापर औषधी वनस्पती म्हणून करण्यात येऊ लागला. आणि आता थेट भाजी म्हणून वापर करण्यात येऊ लागला आहे.

हॉप शूट्स या भाजीला एवढी किंमत येण्यामागील कारण म्हणजे या वनस्पतीमध्ये दोन खास प्रकारची अ‍ॅसिड आहेत. 'ह्यूमोलोन्स' आणि 'ल्यूपोलोन्स' अशी दोन अ‍ॅसिड या वनस्पतीमध्ये आढळतात. या अ‍ॅसिडच्या मदतीने मानवी शरीरामध्ये अनियंत्रीत पध्दतीने वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशींवर उपचार करता येतो असं मानलं जात आहे. कॅन्सरसारख्या आजारावर उपचार करता येत असल्यामुळे या वनस्पतीला एवढा भाव मिळत आहे. (Vegetables at Rs 1 lakh per kg Farmer goods)

लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

बिहारमधील औरंगाबद जिल्ह्यातील नवीननगर ब्लॉकमधील करमडीह गावामधील अमरेश सिंह या भाजीचं उत्पादन घेणारे भारतातील पहिले शेतकऱी ठरले आहेत. सहा वर्षांपूर्वी अमरेश सिंह यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये  एक किलो हॉप शूट्स एक हजार पौंडाना विकले होते. भारतीय चलनानुसार ही किंमत एक किलो मागे एक लाख रुपये इतकी होते. ही भाजी एवढी महाग असल्याकारणाने भारतात खूपच कमी मिळते. विशेष मागणी केल्यास ही भाजी उपलब्ध करुन दिली जाते.

अमरेश सिंह यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हॉप शूट्सच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात  काही निर्णय घेतले तर या वनस्पतीच्या शेतीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यी कमाई आतापेक्षा किमान दहा पटीने वाढवता येईल. सध्या हॉप शूट्सची शेती वाराणसीमधील भारतीय भाजी अनुसंधान संस्थेमधील डॉ. लाल यांच्यादेखरेखाली केली जात आहे.

कलेक्टर सुप्रियो साहू यांनी अमरेश सिंह यांच्या या प्रायोगिक तत्वावरील शेतीसंदर्भात ट्विट केलं असून सध्या खूप व्हायरल होतं आहे. ‘’एक किलो भाजीची किंमत एक लाख रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे ही जगामधील सर्वाधिक महाग भाजी आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यामधील अमरेश सिहं हे या वनस्पतीचे उत्पादन घेणारे पहिले भारतीय ठरले आहेत. भारतीय शेतकऱ्यांसाठी पुढील काळामध्ये गेम चेंजर ठरु शकते.’’ असं सुप्रियो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

संबंधित बातम्या