देशासाठी लसीची कमतरता असताना दुसऱ्या देशांना लसपुरवठा कशासाठी? 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

अनेक राज्यांना लसीचा पुरवठा कमी पडत आहे.  केंद्राकडून राज्यांना लसीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हळू लसीकरणाच्या धोरणवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, मध्यप्रदेशसह दिल्लीतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोना लसीकरण मोहिमही सुरू झाली आहे. मात्र अनेक राज्यांना लसीचा पुरवठा कमी पडत आहे.  केंद्राकडून राज्यांना लसीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हळू लसीकरणाच्या धोरणवर निशाणा साधला आहे.  कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीकरण मोहिमेतील सुधारणेबाबत पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे राहुल गांधींनी लसींचा अभाव आणि लसीकरणातील कमी गतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी सरकारला अनेक सूचना दिल्या आहेत. (Why supply vaccines to other countries when there is a shortage of vaccines for the country) 

"मोदीजी देशाच्या जनतेला टोप्या घालू नका"

सध्या देशाला साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागत आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन कोरोना दूर करण्यासाठी लस तयार करण्यासाठी काम केले, परंतु सरकारने लसीकरण कार्यक्रम योग्यप्रकारे राबविला नाही. या गतीने लसीकरण केल्यास 75 टक्के लोकांना लस देण्यासाठी अनेक वर्षांचा कलावधी लागेल. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, आपल्याकडे अनेक राज्यात लसीचा पुरवठा बंद झाला आहे, राज्यांनी लसीच्या पुरवठ्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र केंद्र सरकार कोणत्याही कारणाशिवाय परदेशात लसीचे पुरवठे करत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री बिगर भाजपा शासित राज्यांवर टीका करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी आज ट्विटद्वारेही केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लसीकरण' हा उत्सव नसून वाढत्या कोरोनाच्या काळात लसीची कमतरता खूप मोठी गंभीर समस्या आहे. मग या संकटाच्या काळात लस निर्यात योग्य कितपत योग्य आहे, आपल्या देशातील नागरिकांना धोका नाही का, असं सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.  केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोणताही पक्षपात न करता लसीचा पुरवठा करावा, आपल्या सर्वांना एकत्रितपणे या महामारीवर मात करायची आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

संबंधित बातम्या