योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

उत्तरप्रदेशात एकाच दिवशी दोन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झालं आहे.

लखनऊ: देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे सरकारबरोबर नागरिकांचीही चिंता वाढत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन या बाबतची माहिती दिली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण आता विलगीकरणात असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. याआगोदर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. उत्तरप्रदेशात एकाच दिवशी दोन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. (Yogi Adityanath contracted corona)

योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर मी कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांच पूर्णपणे पालन करत आहे’’. असं म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी आपण सध्या व्हर्च्युअल माध्यमातून सर्व कामे करत असल्याचंही  सांगितलं आहे.

परदेशी लसीच्या आयातीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

राज्यातील सर्व कामकाज नेहमीप्रमाणे सामान्य स्थितीत सुरु असताना योगी आदित्यनाथ यांनी आपल्य़ा संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचं तसेच काळजी घेण्याचं आवाहनं केलं आहे.

संबंधित बातम्या