भाजपने उमेदवारी दिल्यास पुन्हा निवडणूक लढवू : दीक्षा कांदोळकर 

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

हळदोणे : भाजपने आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत शिरसई जिल्हा पंचायत मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करताना माझ्या नावावर शिक्कामोर्तब केल्यास आनंदाने जिल्हा पंचायतीच्या निवडणूक रिंगणात पुन्हा उतरणार असल्याचे विद्यमान शिरसई जिल्हा पंचायत सदस्य दीक्षा कांदोळकर यांनी सांगितले.

हळदोणे : भाजपने आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत शिरसई जिल्हा पंचायत मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करताना माझ्या नावावर शिक्कामोर्तब केल्यास आनंदाने जिल्हा पंचायतीच्या निवडणूक रिंगणात पुन्हा उतरणार असल्याचे विद्यमान शिरसई जिल्हा पंचायत सदस्य दीक्षा कांदोळकर यांनी सांगितले.

स्वत:च्या मतदारसंघात केलेल्या अनेक विकासकामांचा आढावा घेताना त्या म्हणाल्या, शिरसई जिल्हा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या शिरसई, थिवी, नास्नोळा व मयडे पंचायत क्षेत्रात साडेचार वर्षांच्या कालावधीत सुमारे एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. अन्य अनेक विकासकामांच्या फाईल मंजुरीसाठी सरकारी कार्यालयात आहेत. काही विकासकामांचे आराखडे ना हरकत दाखल्यांसाठी अडकून पडले आहेत. आगामी पाच वर्षांचा कालावधी मिळाल्यास जिल्हा पंचायत फंडातून अनेक विकासकामे पूर्ण करून जनतेची स्वप्ने साकार करण्यात येणार आहेत, असे त्या म्हणाल्या.

पेडण्यात कसिनो नकोच, प्रयत्न हाणून पाडू

थिवी विधानसभा मतदारसंघ व हळदोणे विधानसभा मतदारसंघातील शिरसई, थिवी, नास्नोळा व मयडे पंचायत क्षेत्रात विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी, थिवी मतदारसंघाचे माजी आमदार किरण कांदोळकर व हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केल्यामुळे जिल्हा पंचायतीतर्फे शिरसई मतदारसंघातील अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत, असेही त्या म्हणाल्या.

अपूर्ण राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी भाजप पक्षातर्फे आगामी जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्यास संधी दिल्यास लोकांची अपूर्ण राहिलेली विकासकामे पूर्ण करून शिरसई जिल्हा पंचायतीचा सर्व दृष्टिकोनांतून विकास साधण्यात येणार असल्याचेही दीक्षा कांदोळकर यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या