पिसुर्ले सत्तरीत खनिज माल उचलण्यास शेतकर्यांचा विरोध  

mineral
mineral

वाळपई:खनिज माल उचलण्यास शेतकऱ्यांचा विरोध
पिसुर्ले सत्तरीततील २३ जणांचे निवेदन प्रसंगी वाहतूक अडविण्याचा इशारा
पिसुर्ले सत्तरी येथील खनिज माल उचलण्यास शेतकरी वर्गाचा तीव्र विरोध असून ही खनिज वाहतूक उचलली तर वाहतूक रोखून धरण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे. यासंबंधी आज शुक्रवारी २३ शेतकरी बंधूंनी वाळपई उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांना सह्या केलेले निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिसुर्ले भागात खनिज व्यवसाय सुरू होता. खनिज खाणी बंदीनंतर व्यवसाय ठप्प आहे. परंतु डंप केलेला खनिज माल उचलला जाणार आहेत. तशा हालचाली खनिज कंपनी करीत आहे. पिसुर्लेतील सदर भागात खाणींमुळे शेतीची बरीच नुकसानी झाली आहे. २०१७ सालापासूनची नुकसान भरपाई दिलेली नाही, खाण माती भात शेतात साचून राहिलेली आहे. ही खनिज माती साचून राहिली आहे, ती काढलेली नाही. तसेच खनिज खंदकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलेले आहे. हे पाणी गायींना पिण्यासाठी, शेती बागायतीसाठी सोडले तर सिंचनाची चांगली सोय होणार आहे. पण या गोष्टींकडे कंपन्यांनी दुर्लक्ष केले आहे. वरील तीनही मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोवर खनीज माल उचलण्यास आमचा विरोधच असणार आहे, असे नमुद केले आहे.
आज हनुमंत परब, जयेश्वर गावडे, नारायण च्यारी, बाबूसो गावडे यांनी उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर व मामलेदार अनिल राणे सरदेसाई यांना निवेदन सादर करून चर्चा केली आहे. जिल्हाधिकारींनी पुढील आठवड्यात एकत्र बैठक घेण्याचे सांगितले आहे.
हनुमंत परब म्हणाले, पिसुर्लेत फोमेंतो खनिज कंपनीने माल काढला होता. जेव्हा सरकारने ई लिलावाव्दारे खनिज व्यवहार केला तेव्हा हा माल सेसा कंपनीने घेतला आहे. त्यामुळे आता हा खनिज माल सेसा कंपनी उचलुन वाहतूक करण्याच्या तयारीत आहेत. ती वाहतूक आम्ही करू देणार नाही असे परब म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com