जलमार्गाच्या वापरासाठी राज्य शासनाचा नवीन निर्णय

floating jetties to be built in the state
floating jetties to be built in the state

पणजी : पोर्तुगीज काळात वापरल्या जाणाऱ्या जलमार्गांचा वापर करण्यासाठी राज्यात ३० तरंगत्या जेटी उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्र सरकारकडे त्याविषयीचा प्रस्ताव पाठविणार असून, त्यासाठी सुमारे २० ते २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पणजीतील आणि देशातील पहिल्या तरंगत्या जेटीच्या अनावरणप्रसंगी तरंगत्या जेटीचे महत्त्व पटवून दिले होते. तरंगत्या जेटी निर्माण झाल्यानंतर जलमार्गावर फेरी चालविण्यासाठी खासगीकरणाचा वापर केला जाऊ शकतो, त्यासाठी अनेक युवकांना रोजगार मिळू शकतो. त्यादृष्टीने या वाहतुकीचे महत्त्व वाढणार असल्याचे लोबो यांनी सांगितले होते.

पणजीतील जुन्या सचिवालयासमोर उभारलेल्या तरंगत्या जेटीप्रमाणे धेंपो हाऊस, शापोरा नदीमध्‍ये शापोरा येथे आणि जुने गोवा येथे काही दिवसांत तरंगत्या जेटी उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील अरुंद रस्ते आणि महामार्ग रुंदीकरणाला भविष्यात येणाऱ्या अडचणी पाहता जलमार्गाचा वापर होणे अपेक्षित असल्याचा विचार राज्य सरकारलाही पटला आहे. केंद्रीय जलवातूक प्राधिकरणाच्या साह्यातून अशाप्रकारच्या तरंगत्या जेटींची सेवा दिली जाणार आहे. राज्यात नदी आणि खाडींचा वापर जलवाहतुकीसाठी केल्यास ३० ठिकाणी जेटी उभारल्या जाऊन गावे एकमेकांना जोडली जाऊ शकणार आहेत.

या जेटीला कोणत्या प्रकरणाचा पर्यावरणीय दाखला घ्यावा लागणार नाही, ही या जेटीचे वैशिष्ट्य आहे. एका ठिकाणाहून कोणत्याही ठिकाणी ही जेटी स्थलांतर करणे शक्य होते, त्यामुळे या जेटीचे महत्त्व पुढील काळात वाढणार आहे. राज्यांतर्गत पर्यटनवाढीसाठीही त्याचा उपयोग होऊ शकणार आहे. मंत्री लोबो यांनी राज्याची तरंगत्या जेटीची गरज केंद्रीय मंत्री मांडविया यांच्यासमोर व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मांडविया यांनीही गोवा राज्याच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही दिल्याने काही महिन्यांनी राज्यात ३० ठिकाणी तरंगत्या जेटी दिसू शकतील, अशी आशाही आहे.

रोजगाराच्या संधी वाढणार!
तरंगत्या जेटी उभारल्यानंतर परदेशी पर्यटकांच्या यॉटही या जेटीवर स्थिराऊ शकतात. त्यामुळे त्यामाध्यमातून परदेशी पर्यटक गोव्यात येतील, त्यांच्या राहण्याच्या आणि खरेदीमुळे आर्थिक उलाढाल होईल. त्याचबरोबर राज्यातील नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर असलेल्या गावांतील लोकांची वाहतूक करणाऱ्या फेरीबोट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खासगीकरणाचा पर्याय उपलब्ध झाल्यास अनेक नवोदित उद्योजकांना त्याचा फायदा होऊ शकतो, असे मंत्री मायकल लोबो यांचे मत आहे.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com