नेपाळच्या पंतप्रधानांच्या अडचणी वाढल्या; चार मंत्र्यांसह 26 खासदारांना कोरोनाची लागण

दैनिक गोमंतक
रविवार, 9 मे 2021

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली (Kp Sharma Oli) यांची समस्या कमी होत नाहीये.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली (Kp Sharma Oli) यांची समस्या कमी होत नाहीये. अल्पमतात कार्यरत असलेल्या सरकारचे विश्वास मत मिळविण्यातही कोरोनाने (Coronavirus) अडचणी वाढवल्या आहेत. विशेष अधिवेशनापूर्वी सरकारच्या चार मंत्र्यांसह 26 खासदारांना (MP) कोरोनाची लागण झाली आहे. विश्वास मत मिळवण्यासाठी सोमवारी 10 मेचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. विशेष सत्राच्या तयारीसाठी सर्व खासदारांची पीसीआर चाचणी घेण्यात येत आहे. मोठ्या संख्येने खासदारांना संसर्ग झाल्याने चिंता वाढली आहे. संक्रमित चार मंत्र्यांपैकी दोन अद्याप खासदार नाहीत. संसदेचे सचिव गोपाल नाथ योगी यांनी खासदारांना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की या खासदारांच्या मतदानाची व्यवस्था सभापतींकडून ठरविली जाईल.

नासाने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या हेलिकॉप्टरचा आवाज केला कैद: पहा व्हिडिओ

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या या सरकारचे विश्वास मत मिळवण्यासाठी राष्ट्रपतींनी विशेष अधिवेशन बोलावले आहे. आतापर्यंत या सरकारमध्ये सामील झालेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळने आपला पाठिंबा मागे घेतला आहे. नेपाळच्या खालच्या सभागृहात सध्या 271 सदस्य विश्वास मतात भाग घेणार आहेत. पंतप्रधान ओली यांना आपले सरकार वाचवण्यासाठी 136 मतांची गरज भासणार आहे. नेपाळमध्ये कोरोना संसर्ग शिगेला आहे. पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांना मदतीचे आवाहन केले आहे.

AMERICA: टाईम्स स्क्वेअरमध्ये चार वर्षाच्या मुलीसह तिघांवर गोळीबार

दरम्यान नेपाळमध्ये मागच्या 24 तासात 9,023 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत नेपाळमध्ये 3,85,890 रुग्ण आढळले असून 2,98,765 रुग्णांनाही कोरोनावरती मात केली आहे. 3,632 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या नेपाळमध्ये 83,693 सक्रिय रुग्ण आहेत.(26 MPs, including four ministers of Nepal, were infected with corona)  

संबंधित बातम्या