बेल्जियमच्या शेतकऱ्याने 'एक दगड' सरकवला आणि फ्रांस छोटा झाला.....

The Belgium farmer moved ‘a stone’ and France became smaller
The Belgium farmer moved ‘a stone’ and France became smaller

शेताचा बांध कोरला म्हणून नेहमीच ग्रामीण भागात भांडण होत असतात. मात्र एखाद्या शेतकऱ्याने थेट दोन देशांची सीमाच सीमाच सरकवली अस जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. हो...बेल्जियमच्या (Belguium) एका  शेतकऱ्याने केलेल्या एका छोट्याश्या चुकीमुळे बेल्जियम आणि फ्रांस (France) देशाच्या सीमा बदलल्या आहेत. या चुकीमुळे फ्रांस देश छोटा झाला. (The Belgium farmer moved a stone and France became smaller)

इतिहासाचा अभ्यास करणारी स्थानिक व्यक्ती बेल्जियमच्या सीमावर्ती भागात भटकंती करत असताना एक गोष्ट  त्या व्यक्तीच्या लक्षात आली. सीमावर्ती भागात असणाऱ्या एका शेतकऱ्याने केलेल्या एका चुकीमुळे फ्रांस देश छोटा झाला असल्याचे समोर आले आहे. शेतात काम करताना आपल्या ट्रॅक्टरच्या मार्गात नेहमी एक दगड येत होता. त्यामुळे या माणसाने हा दगड उचलून बाजूला नेऊन ठेवला आणि हे सगळं प्रकरण घडलं. 

फ्रांस आणि बेल्जियम यांच्यात जवळपास 620 किमीची भुसीमा आहे. आणि या शेतकऱ्याने जो दगड उचलून बाजूला ठेवला, तो दगड होता या दोन देशांच्या सीमा निर्धारित करणारा दगड होता. वॉटरलु येथे झालेल्या नेपोलियनच्या पराभवानंतर पाच वर्षांनी 1820 मध्ये ही सीमा निर्धारित करण्यात आलेली होती. 

बेल्जियम मध्ये राहत असलेल्या या शेतकऱ्याने हा दगड उचलून 7.5 फूट फ्रान्सच्या बाजूला नेऊन ठेवला असल्याचे दिसून आले आहे. यामुळे फ्रांसचा भूभाग छोटा झाला आणि बेल्जियम देश मोठा झाला असे म्हटले जाऊ लागले आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही देशांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. बेल्जियम मधील एरकेलाईन्स गायचे मेयर डेविड लावोक्स यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये "त्या शेतकऱ्याने बेल्जियमला मोठे केले आहे, आणि फ्रान्सला छोटे करण्यासाठी ही चांगली आयडिया आहे" अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर फ्रांस मध्ये असलेल्या गावाच्या प्रमुखांनी "आम्ही एका नव्या सीमावादापासून वाचण्यासाठी नक्कीच यशस्वी होऊ" अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणामुळे 1930 पासून निष्क्रिय असलेल्या फ्रेंको- बेल्जियम सीमा आयोगाला मात्र आता सक्रिय व्हावे लागले असल्याचे पाहायला मिळते आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com