सोशल मिडियावरील विषाणूपासून सावध रहा; अमेरिकेतील भारतीय डॉक्टरचा सल्ला

Beware of the virus on social media Advice from Indian doctors in the US
Beware of the virus on social media Advice from Indian doctors in the US

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) वाढत असताना अमेरिकेतील भारतीय वंशाचे सर्जन विवेक मूर्ती (Vivek Murthy) यांनी कोरोनासंदर्भातल्या दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात भारत आणि अमेरिका अडकले आहेत. अशावेळी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरुन न जाता आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या कोरोना संकटाला सामोरं जायला हवं. आणि या संदर्भात काही गोष्टीही जाणून घ्यायला हव्यात. सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल होणारी माहिती किती धोकादायक ठरु शकते याबद्दलही डॉ. मूर्ती यांनी सांगितले. (Beware of the virus on social media Advice from Indian doctors in the US)

डॉ. मूर्ती म्हणाले, धोकादायक माहिती हाच एक मोठा विषाणू आहे जो लोकांना मोठ्याप्रमाणात हानी पोहचवत आहे. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून अनेकजण स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशा कोरोना महामारीच्या काळात माहीती हे सर्वात प्रभावी माध्यम ठरतं आहे. जर नागरिकांना योग्य माहिती मिळाली तर ते स्वत:चे संरक्षण योग्य पध्दतीने करु शकतात. याबाबत उदाहरण देताना ते म्हणाले, सरकारने किंवा खासगी कंपन्यांनी मास्क, आवश्यक त्या लसी तर बनवल्या पण लोकांना जर याबद्दल चुकीची माहिती मिळत असेल तर त्यांचा काही उपयोग होणार नाही.

कोरोनामुळे भारत आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. इथे कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येचे प्रमाण मोठे आहे. अमेरिका (America) याबबतीत पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत (India) दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही देशांना चुकीच्या माहितीचा मोठा फटका बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com