बायडन प्रशासनाचा मोठा निर्णय; 18 वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार लस

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

19 एप्रिलपासून 18 वर्षावरील प्रत्येक नागरीकाला कोरोनाची लस घेता येईल  असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं आहे.

जगभरात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोनावर मात करण्यासाठी 18 वर्षावरील प्रत्येकाला कोरोनाची लस देण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतला आहे. बायडन यांनी मंगळवारी या निर्णयाची घोषणा केली आहे. 19 एप्रिलपासून 18 वर्षावरील प्रत्येक नागरीकाला कोरोनाची लस घेता येईल  असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं आहे.

याआगोदर अमेरिकेने 1 मे पासून 18  वर्षावरील प्रत्येक नागरीकाला कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी बायडन यांनी 1 मे ऐवजी 19 एप्रिलपासून 18 वर्षावरील प्रत्येकाला कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आम्ही 150 दशलक्ष डोस देण्याचा आकडा ओलांडला आहे, असं सांगितलं आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून 100 दिवस पूर्ण होईपर्यंत 200 दशलक्ष डोसचा आकडा पार करु अशी आपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच 150 दशलक्ष डोस देण्याचा आकडा पार करणारा त्याचबरोबर 62  दशलक्ष लोकांचं पूर्णपणे लसीकरण करणारा अमेरिका पहिला देश असल्याचही ते म्हणाले. (Biden administrations big decision Everyone over the age of 18 will get the vaccine)

कोरोनाचं मानवाकडून प्राण्यांमध्येही संक्रमण; डब्ल्यूएचओचा धक्कादायक दावा 

तर दुसरीकडे भारतामध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. कोरोनाची लस 18 वर्षापुढील सर्वच नागरीकांना देण्यात यावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. याबाबत असोसिएशनने मंगळवारी नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.

 

संबंधित बातम्या