नेपाळ सरकारवर हवेच्या प्रदूषणामुळे ओढवली वेगळीच नामुष्की; वाचा संपूर्ण प्रकरण

A different disgrace to the Government of Nepal due to air pollution Read the full episode
A different disgrace to the Government of Nepal due to air pollution Read the full episode

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नेपाळला वाढत्या हवा प्रदूषणाने पछाडले आहे. सोमवारी नेपाळ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नेपाळ सरकारने आपत्कालीन बैठक बोलावून वाढत्या हवा प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करत देशातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नेपाळचे विज्ञान व प्रद्योगिक मंत्री कृष्ण गोपाळ श्रेष्ठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत देशातील शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जारी करण्यात आलेल्या निर्णयात म्हटले आहे की, ''शुक्रवार पर्यंत देशातील सर्व शिक्षण संस्था बंद करण्य़ाचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ज्या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक परिक्षा चालु आहेत त्या महाविद्यालयांनी योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात. (A different disgrace to the Government of Nepal due to air pollution Read the full episode)

मंत्रालयाकडून मुलांच्या माता पित्यांनाही अनुरोध करण्यात आले की,  मुलांना घरातच ठेवावे बाहेर प्रदूषीत हवेत पाठवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वाढते हवा प्रदूषण हे नेपाळसाठी मोठी समस्या बनली आहे.

देशातील 54 जिल्ह्यांमधील वाढत्या वृक्षतोडीमुळे मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण वाढले आहे. यामुळे देशात अधिकांश हवा प्रदूषीत बनत चालली आहे. मोसम विज्ञानिकांच्या मतानुसार, एअर क्वॉलिटीमध्ये सुधार होण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी लागणार आहे. नेपाळ सरकारने सूचित केले की, वाढत्या हवा प्रदूषणामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. हिमालयीन नेशनचा एक्यूआई शुक्रवारी अधिक खतरनाक बनला आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com