डोनाल्ड ट्रम्प यांच्या उचापती सुरुच; फेसबुकने केली पुन्हा एकदा कारवाई

Donald Trumps healing continues Facebook took action once again
Donald Trumps healing continues Facebook took action once again

अमेरिकेच्या राजधानीमधील कॅपिटल्स हिलवरील हिंसक घटना लोकशाहीला काळीमा फासणारी ठरली. सहा जानेवारी रोजी झालेल्या अमेरिकेतील हिंसेनंतर फेसबुकसह अन्य सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सने प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप करत अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातली होती. मात्र त्यानंतरही कधी ट्विटर या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सला पर्यायी साईट सुरु करण्यापासून ते अगदी लग्नाच्या रिसेप्शमध्ये जाऊन सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीका करण्यापर्यंत अनेक गोष्टीमुळे पुन्हा एकदा ट्रम्प चर्चेत आले आहेत. असं असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला असाच एक विचित्र प्रकार समोर आला असून त्यांच्यावर बंदी घातल्यानंतरही त्यांनी सुनेच्या फेसबुक पेजवरुन आपल्या फॉलअर्सशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.

सून लारा ट्रम्प हिच्या फेसबुक पेजवरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र फेसबुकने ट्रम्प यांचा हा व्हिडिओ डिलीट केला आहे. फेसबुकने व्हिडिओ हटावण्याच्या संदर्भात इशाराही दिला होता. लारा ट्रम्प यांच्या फेसबुक पेजवरुन, ट्रम्प यांना झालेल्या प्रकाराचा साक्षात्कार झाला असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र फेसबुकने तडक कारवाई करत व्हिडिओ काढून टाकला असल्याचा मेल लारा यांना केला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांचा आवाज असल्याने हा व्हिडिओ काढून टाकला असल्याचे फेसबुकने लारा यांना कळवलं असल्याचं रॉटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. (Donald Trumps healing continues Facebook took action once again)

लारा ट्रम्प यांनी फेसबुकने पाठवलेला ईमेलचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. यामध्ये फेसबुकने लारा यांना दिलेल्य़ा इशाऱ्यामध्ये, ‘’आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, डोनाल्ड ट्रम्प यांचा आवाज असणारा व्हिडिओ फेसबुक पेजवरुन काढून टाकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक आकांउट बंद आहे. यापुढेही डोनाल्ड ट्रम्प यांचा आवाज असणारा व्हिडिओ आम्ही काढून टाकण्याची कारवाई सुरु ठेऊ,’’ असं म्हटलं आहे.

जानेवारी महिन्यामध्ये अमेरिकेतील कॅपिटल्स हिल्सवर झालेल्या हिंसेच्या पाश्वभूमीवर फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट युट्यूबनेही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lara Trump (@laraleatrump)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com