मोठी बातमी: फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींना तीन वर्षांची शिक्षा

दैनिक गोमन्तक
सोमवार, 1 मार्च 2021

फ्रान्सच्या कोर्टाने देशाचे माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचाराप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती मिळाली आहे.

फ्रान्सच्या कोर्टाने देशाचे माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचाराप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या तीन वर्षाच्या शिक्षेपैकी दोन वर्षाची शिक्षा निलंबित राहणार आहे. निकोलस सार्कोझी यांच्यावर मोनॅको मध्ये एका न्यायाधीशांना उच्च पदासाठी मदत करण्याच्या प्रस्तावाचा आरोप आहे. सार्कोझी यांनी आपल्या इलेक्शन कॅम्पेनच्या फायनान्स तपासणीच्या बाबतीत आतील माहिती देण्याच्या बदल्यात मदतीची ऑफर दिली होती.    

चीननं भारतातील केली बत्ती गुल? अमेरिकेनं उघड केली धक्कादायक माहिती

निकोलस सार्कोझी यांना सुनावण्यात आलेल्या तीन वर्षाच्या शिक्षेपैकी दोन वर्षाची शिक्षा निलंबित राहणार असल्याचा अर्थ एक वर्षाच्या तुरूंगवासाच्या शिक्षेमुळे सार्कोझी यांना शारीरिकदृष्ट्या तुरुंगात जाण्याची गरज नसणार आहे. फ्रान्समध्ये हा नियम सहसा केवळ दोन वर्षापेक्षा जास्त तुरूंगवासाच्या प्रकरणांमध्ये लागू होतो.

चीन अमेरिकेत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी?

दरम्यान, आज फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी आढळले. व त्यानंतर न्यायालयाने न्यायाधीशांवर बेकायदेशीरपणे प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना दोषी करार देत तीन वर्षांची शिक्षा सुनावली. 

 

 

संबंधित बातम्या