नेपाळच्या सैन्याला भारतीय सैन्याची मोठी मदत

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

भारतीय लष्कराने नेपाळ लष्काराला कोवीड-19 प्रतिबंधक लसींचे एक लाख डोस भेट म्हणून दिले आहेत.

जगभरात कोरोना वाढत पादुर्भाव चिंता वाढत असताना द्विपक्षीय सहाकार्य वाढवण्यासाठी दोन शेजारी देशांच्या सैन्यदलाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय लष्कराने नेपाळ लष्काराला कोवीड-19 प्रतिबंधक लसींचे एक लाख डोस भेट म्हणून दिले आहेत. नेपाळमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय लष्काराच्या अधिकाऱ्यांनी रविवारी नेपाळ लष्कराच्या हाती या लसी दिल्या असल्याचे भारतीय दूतावासाने ट्विट करुन सांगितले.

भारत सरकारने यापूर्वी नेपाळच्या आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन कामगारांच्या तात्काळ आवश्यकतेसाठी ‘मेड इन इंडिया’ कोवीड-19 प्रतिबंधक दहा दशलक्ष लसी नेपाळला भेट दिल्या होत्या. दरम्यान चीनने सोमवारी नेपाळला 8 लाख कोवीड-19 लसींचे दान केले असल्याचे नेपाळच्या मिडियाच्या वृत्तानुसार सांगण्यात आले. (Great help of Indian troops to Nepal army)

चीनची कोरोना लस घेऊनसुद्धा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कोरोना बाधित

हिमालय टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या वेरो सेलच्या लसी चीनचे राजदूत होया यांकी यांनी नेपाळचे आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री ह्रदेश त्रिपाठी यांना या कार्यक्रमासाठी आयोजित केलेल्या समारंभात दिल्या होत्या.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोवीशील्ड लसींच्या खरेदीस उशीर केल्यामुळे नेपाळ सरकारने देशात सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली आहे. काठमांडू पोस्टने दिलेल्य़ा वृत्तानुसार, नेपाळ सरकारने 15 मार्चपर्यंत दोन टप्प्यात 1.7 दशलक्षाहूंन अधिक लोकांना रोप्रतिबंधक लस दिल्यानंतर देशातील लसीकरण मोहिमेला रोख लावला होता. नेपाळमध्ये कोरोना बाधित 2,76,839 प्रकरणे आहेत आणि आत्तापर्यंत 3027 मृत्यूंची नोंद झाली आहे. 

https://twitter.com/ANI/status/1376291487957196804?ref_src=twsrc%5Etfw%7...

संबंधित बातम्या