चोक्सीच्या प्रत्यार्पणसाठी भारताने डोमिनिकाला पाठविली कागदपत्रे

India sends documents to Dominica for extradition to Choksi
India sends documents to Dominica for extradition to Choksi

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील (PNB Scam) व्यापारी मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणसाठी भारताने डोमिनिकाला अनेक कागदपत्रे पाठविली आहेत. मेहुल चोकसी सध्या कॅरिबियन बेटातील (डोमिनिका) देशात आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अँटिगा (Antigua) येथून क्युबाला पळ काढला होता. परंतु तेथे त्याल पोलिसांनी ताब्यात घेत पुन्हा अँटिगा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.  62 वर्षांचा चोकसी नागरिकत्व मिळाल्यानंतर 2018 पासून अँटिगामध्ये राहत होता.

केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) च्या तपास यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले दिलेल्या माहितीनुसार, डोमिनिकाला फक्त खटल्याच्या फाईल्स पाठवल्या गेल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालय डोमिनिका आणि अँटिगा सरकारांशी मेहुल चोकसी प्रकरणात समन्वय करीत आहे. 

28 मे ला डोमिनिका येथे दाखल झालेल्या खासगी विमानाविषयी विचारले असता, अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन हे आज स्थानिक माध्यमांना बोलताना म्हणाले, ते खासगी जेट भारताचे आहे. चोकसी हा खरोखरच एक पळपुटा माणूस आहे. याची पुष्टी करण्यासाठी भारत सरकारने काही कागदपत्रे पाठविली आहेत. त्याचा वापर करुन पुढील बुधवारी कोर्टाच्या सुनावणीत होईल. ते म्हणाले, भारत सरकार मेहुल चोकसीला पुन्हा भारतात नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जेणेकरून तेथे त्याचे आरोप सिद्ध होऊ शकतील. सूत्रांनी सांगितले की मेहुल चोकसीने अँटिगा येथून पळ काढल्यामुळे त्यांची प्रत्यार्पण सुकर झाली आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com