ऑस्ट्रेलिया सरकारचा मोठा निर्णय; भारतातून येणारी प्रवासी विमानं 15 मे पर्यंत केली रद्द

A major decision by the Australian government Passenger flights from India canceled till May 15
A major decision by the Australian government Passenger flights from India canceled till May 15

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच भारतात जाण्यास अनेक देशांनी आपल्या  नागरिकांना बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियानं (Australia) देखील कठोर निर्णय घेतला आहे. भारतातून (India) ऑस्ट्रेलियाला जाणारी सर्व प्रवासी विमानं रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने  घेतला आहे. याआगोदर एअर इंडियानं (Air India) ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं रद्द केली आहेत. सध्या भारतात आयपीएलचा हंगाम सुरु असून अनेक खेळाडू, सपोर्ट स्टाफ, आणि काही नागरिक देखील भारतात आहेत. ते देखील भारतात अडकून पडले आहेत. त्यामुळे आता 15 तारखेपर्यंत त्यांना परत ऑस्ट्रेलियाला जाता येणार नाही. (A major decision by the Australian government Passenger flights from India canceled till May 15)

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस (Scott Morrison) यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे, ''15 मे पर्यंत असणारी प्रवासी विमानांनवर बंदी कायम राहणार आहे. भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये येणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाचा धोका वाढू शकतो म्हणून ही बंदी आता कायम असणार आहे,'' असं स्कॉट मॉरिस यांनी स्पष्ट केलं आहे. यापूर्वी थायलंड, नेदरलॅंड, इराण, कॅनडा, युएई, हॉंगकॉंग या देशांनी देखील भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर रोख लावला होता. एअर इंडियाने देखील नुकतीच ब्रिटनला (Briten) जाणारी आणि येणारी विमानं 30 एप्रिलपर्यंत रद्द केली होती.   

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com