नीरा टंडन यांची व्हाईट व्हाऊसच्या वरिष्ठ सल्लागार पदी वर्णी

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 मे 2021

50 वर्षीय टंडन व्हाइट हाऊसमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारतील.

भारतीय-अमेरिकन नीरा टंडन (Neera Tanden) यांची अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन सभासदांच्या तीव्र आक्षेपामुळे दोन महिन्यांपूर्वी त्यांनी व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ मॅनेजमेंट बजेटमध्ये संचालक म्हणून पदभार स्वीकारण्यास नकार दिला होता. सोमवारी, 50 वर्षीय टंडन व्हाइट हाऊसमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारतील. (Nira Tandon as White House Senior Advisor)

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी नीरा टंडन यांना वरिष्ठ सल्लागार म्हणून त्यांच्या प्रशासनात वरिष्ठ जबाबदारी सोपविली आहे. अध्यक्ष बायडन यांनी त्यांच्या अनुभवाचे, कौशल्यांचे आणि कल्पनांचे कौतुक केले आहे. आम्ही नीरा टंडन यांचा खूप आदर करतो आणि आपल्या प्रशासनात त्यांचा समावेश करू इच्छितो असेही ते म्हणाले. आता नीरा टंडन यांना बायडन यांच्या प्रशासनात  महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या नीरा टंडन सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसच्या सीईओ आणि अध्यक्ष आहेत.

WHO: दुसरे वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक प्राणघातक

नीरा यांनी आपल्या करिअरची सुरुवात माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन (Bill Clinton) यांच्या अध्यक्षतेखाली व्हाईट हाऊसमध्ये डोमेस्टिक पॉलिसीसाठी असोसिएट डायरेक्टर आणि फर्स्ट लेडीच्या वरिष्ठ पॉलिसी सल्लागार म्हणून केली होती. त्यांनी लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून येल लॉ स्कूल व कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.
 

संबंधित बातम्या