अफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे पाकिस्तानची नाचक्की

The plane of Pakistan parliamentary representative was denied permission to land in Afghanistan for security reasons
The plane of Pakistan parliamentary representative was denied permission to land in Afghanistan for security reasons

इस्लामाबाद: अफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. पाकच्या संसदीय प्रतिनिधींच्या विमानाला सुरक्षेच्या कारणास्तव अफगाणिस्तानमध्ये लँडिंगची परवानगी नाकरली. पाकिस्तानचे विमान काबूलमध्ये उतरणार होते. मात्र आता सुरक्षेच्या कारणास्तव ही ट्रीप रद्द करण्यात आली असल्याची माहिती समजते. अफगाणिस्तानातील पाकिस्तानचे विशेष प्रतिनिधी मोहम्मद सादिक यांनी गुरुवारी एका ट्विटद्वारे याची माहिती दिली. 

सादिक यांनी म्हटलं की, "सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ बंद करण्यात आल्याने सभापतींचा काबूलचा दौरा रद्द करण्यात आला आहे. विमान खाली उतरत असतांना विमानतळ प्रशासनाने वैमानिकाला विमानतळ बंद असल्याची माहिती दिली. आता याबाबत चर्चा केल्यानंतरच प्रवासाच्या नवीन तारखा ठरविल्या जातील." 

वृत्तानुसार संसदीय सचिव असद कैसर यांच्या नेतृत्वाखालील पाच संसदीय प्रतिनिधी तीन दिवसांच्या भेटीसाठी अफगाणिस्तानाला जाणार होते. यावेळी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी चर्चा होणार होती. मात्र, पाकिस्तानचे माजी सिनेट सदस्य फरहतुल्ला बाबर याचा दौरा वेळेवर रद्द झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एफएटीएफद्वारे पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या भीती असल्याची शक्यता या घटनेकेडे पाहताना व्यक्त केली जात आहे. कॅनडाचे माजी राजदूत ख्रिस अलेक्झांडर यांनी इस्लामाबादला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) ब्लॅक लिस्टमध्ये आणा असे म्हणत इम्रान खान सरकार तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांना पाठिंबा देत आहे, असे म्हटले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानात तालिबान नेत्यांनी त्यांचे अनुयायी आणि तालिबानी लढाऊ सैनिकांना भेटल्याचा व्हिडिओ समोर आला होता. व्हिडिओमध्ये तालिबानच्या मुल्ला अब्दुल गनी बरादर अफगाणिस्तानच्या शांतता चर्चेवर तालिबानी केडरशी बोलताना दिसले होते.

डिसेंबरमध्ये पाकिस्तानचे माजी सिनेट सदस्य अफ्रसियाब खट्टक म्हणाले होते की, अफगाणिस्तानात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी पाकिस्तान तालिबानचा उपयोग ‘टूल’ म्हणून करत आहे. काबूल आणि तालिबान यांच्यात शांततेची चर्चा सप्टेंबरमध्ये दोहा येथे सुरू झाली. डिसेंबरच्या सुरूवातीस, काबूल आणि तालिबान्यांनी घोषणा केली की त्यांनी चर्चेवर सहमती दर्शविली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com