राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं अभिनंदन करत पंतप्रधान मोदी म्हणाले...

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

विविध देशांच्या प्रमुख नेत्यांनी ज्यो  बायडन आणि कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत ज्यो बायडन यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 35 शब्दांत शपथ घेतली. अमेरिकेत झालेल्या या सत्तांतराचं आणि शपथविधी सोहळ्याचं देशभरात स्वागत करण्यात आलं. विविध देशांच्या प्रमुख नेत्यांनी ज्यो  बायडन आणि कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत ज्यो बायडन यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं.

ज्यो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राअध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत बायडेन यांचं अभिनंदन केल. ”भारत-अमेरिकेचे संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. भारत आणि अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्याकडे भरीव असा द्विपक्षीय अजेंडा आहे,” असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"हा एक ऐतिहासिक क्षण आहे. भारत अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी कमला हॅरिस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. भारत-अमेरिका भागीदारी आपल्यासाठी फायदेशीर असणार आहे," असे ट्विट करत पंतप्रधानांनी कमला हॅरिस यांचे अभिनंदन केले.

"आम्ही सर्व सामान्य आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि जागतिक शांतता व सुरक्षेत वाढ करण्यास आणि एकत्रित काम करण्याची वाट बघत आहोत. सोबतच राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

अमेरिकेत सत्तांतर; जो बायडन अमेरिकेचे 46वे मिस्टर प्रेसिडेंट -

कॅपिटॉल हिल येथे आयोजित सोहळ्यात भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता डेमोक्रॅट जोसेफ आर बायडेन ज्युनिअर म्हणजेच ज्यो बायडन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. 

दरम्यान अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन जी. रॉबर्ट ज्युनिअर यांनी कॅपिटॉल हिल्सच्या पश्‍चिम भागात बायडन यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. त्यानंतर अध्यक्ष बायडन यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी त्यांनी अमेरिकी मतदारांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी अमेरिकी सैनिकांकडून मानवंदना स्वीकारली. शपथविधीनंतर अध्यक्ष बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे ‘प्रेसिडेंट एक्सॉर्ट’ कॅपिटॉल हिलवरून व्हाइट हाऊसकडे मार्गस्थ झाले. एरव्ही नव्या अध्यक्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तीन लाखाहून अधिक नागरिक उभे असतात. परंतु यंदा कोरोनामुळे रस्त्यावर अमेरिकी ध्वज लावण्यात आले होते. 

 

 

संबंधित बातम्या