पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लेबनॉनकडून इस्त्राईलवर रॉकेट हल्ला; इस्त्राईलनेही दिले चोख प्रत्युत्तर

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लेबनॉनकडून इस्त्राईलवर रॉकेट हल्ला;  इस्त्राईलनेही दिले चोख प्रत्युत्तर
lebnon, israel attack.jpg

तेल अवीव : इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील युद्ध संपण्याऐवजी अधिकच तीव्र होताना दिसत आहे.  आता या युद्धामध्ये लेबनॉननेही उडी घेतली आहे. बुधवारी इस्त्राईलवर लेबनॉनने चार रॉकेट्स डागण्यात आले. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने हवाई हल्ले केले आहेत. याबाबत इस्त्रायली सैन्याने माहिती दिली आहे. लेबनॉनमधून उत्तर इस्त्राईलमध्ये चार रॉकेट डागण्यात आले. यात एक रॉकेट मोकळ्या क्षेत्रात पडले तर दोन समुद्रात पडले आणि एकावर हवेतच गोळीबार  करण्यात आला झाला. ही परिस्थिती पाहता आता इस्त्राईल विरुद्ध  पॅलेस्टाईन आणि लेबनॉन  या देशांमध्ये महायुद्धाचीही भीती अधिकच तीव्र झाली आहे.  (Rocket attacks on Israel from Lebanon in support of Palestine; Israel also responded) 

हल्ल्यात दहशतवाद्यांचा हात? 
इस्राईलवर डागलेले रॉकेट हल्ले लेबनॉनमधील सक्रिय दहशतवाद्यांनी केले असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. इस्रायलवर डागण्यात आलेले ही रॉकेट्स दक्षिणेतील कलेलेह गावातून डागण्यात आले होते.  यावेळी लेबनीज प्रदेशात किमान चार रॉकेट्स पडले असल्याचे स्थानी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान आता लेबनॉनकडून झालेल्या हल्ल्यामुळे इस्रायलची डोकेदुखी अजूनच वाढली आहे. दोन्ही देशांमधील हे युद्ध महायुद्ध सुद्धा होऊ शकते, अशी भीती तज्ञानी व्यक्त केली आहे. 

हल्ले थांबले नाही तर परिस्थिती अधिक भयावह बनू शकते  
पॅलेस्टाईनवरील इस्त्रायली हल्ले आणि अमेरिकेच्या इस्त्राईल समर्थकांच्या भूमिकेमुळे लेबनॉनची दहशतवादी संघटना हिज्बुल्लाह नाराज आहे. यामुळेच हिज्बुल्लाह दहशतवादी संघटनेने हे रॉकेट हल्ले केले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थितीत जर लेबनॉन सरकारने  हिज्बुल्लाह संघटनेच्या कारवाया रोखल्या नाही तर इस्रायल नाईलाजाने मोठे पाऊल उचलू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर यात इस्रायलला अमेरिकाही पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुर्कस्तानसह सर्व मुस्लिम देश इस्रायलविरोधात उभे राहू शकतात उघडू शकतात.  तर दुसरीकडे तुर्कीदेखील रशियाला रुळावर आणण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसत आहे.

पॅलेस्टाईनवरील हल्ले सुरूच 
दरम्यान, इस्त्रायने गाझा पट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात किमान सहा जण ठार तर अनेक जखमी झाले.  अशातच हमास शासित प्रदेशातून वारंवार रॉकेट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन सैन्याने दक्षिणेकडील अतिरेकी तळांना लक्ष्य केले असल्याचे सैन्याने म्हटले आहे. या हल्ल्यात 40-सदस्यांच्या अल-अस्तल कुटुंबाचे घरही उद्ध्वस्त झाले आहे. तर त्याचवेळी गाझा शहरावरील हवाई हल्ल्यात  हमासच्या हल्ल्यात आमचा एक वार्ताहर मरण पावल्याचे  हमासच्या अल-अक्सा रेडिओने म्हटले आहे.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com