सॅमसंग कंपनी आपला मोबाइल व आयटी डिस्प्ले युनिट चीनमधून भारतात हलवणार

Samsungs IT display unit will be shifted from China to Ind
Samsungs IT display unit will be shifted from China to Ind

नवी दिल्ली: स्मार्टफोन बनविणारी दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी आपला मोबाइल व आयटी डिस्प्ले युनिट चीनमधून भारतात हलवेल. हे युनिट दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये स्थापित केले जाईल. यासाठी कंपनी 4825 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत सॅमसंग डिस्प्ले नोएडा प्रायव्हेट लिमिटेडच्या विशेष उपकरणांना मान्यता देण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “सॅमसंगचा हा भारतातील पहिला हायटेक प्रकल्प आहे. जो चीनमधून नोएडामध्ये हलविण्यात येत आहे.  असे युनिट असणारा भारत जगातील तिसरा देश असणार आहे.

काही महत्वाचे मुद्दे

  • सॅमसंग आपले मोबाइल व आयटी डिस्प्ले युनिट चीनमधून भारतात हलवेल
  • हे युनिट दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये उभारले जाईल, त्यासाठी ती 4825 कोटींची गुंतवणूक करेल.
  • या उत्पादन युनिटमधून 510 लोकांना थेट रोजगार मिळेल

सॅमसंगचे नोएडामध्ये मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये केले होते. त्यानंतर कंपनीने या युनिटमध्ये 4915 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे आश्वासन दिले होते. सॅमसंगने याबाबत ईटीच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. कंपनीने अलीकडेच म्हटले आहे की ‘इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यातीसाठी भारताचे केंद्र बनविण्याच्या नवीन उपायांवर विचार करीत आहे. सॅमसंग तसेच अ‍ॅपलच्या भागीदार कंपन्या फॉक्सकॉन, विस्ट्रोन आणि पेगाट्रॉन यांना अलीकडेच सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड इंसेन्टिव्ह (पीएलआय) योजनेंतर्गत मंजुरी दिली.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com