इजिप्तच्या सुएझ कालव्यात ट्रॅफिक जाम; व्यापार ठप्प

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

इजिप्तच्या सुएझ कालव्यात एक विशाल कंटेनर जहाज अडकल्याने  कालव्यातून होणारा व्यापार ठप्प झाला आहे. हे कंटेनर जहाज चीनमधून माल घेऊन जात होते.

इस्लामिया: इजिप्तच्या सुएझ कालव्यात एक विशाल कंटेनर जहाज अडकल्याने  कालव्यातून होणारा व्यापार ठप्प झाला आहे. हे कंटेनर जहाज चीनमधून माल घेऊन जात होते. एवर गीवन नावाचा हे प्रचंड मोठे जहाज सुएझ कालव्यामध्ये फसल्यामुळे  मोठा  ट्रॅफिक जाम झाला आहे. वाहतुकीची कोंडी झाली आहे.

हे काढण्यास लागू शकते काही दिवस 

असे म्हटले जात आहे की हे कंटेनर जहाजाचे नियंत्रण गमावल्याने ते अडकले, ज्यामुळे समुद्रात मालवाहू जहाजांची लांबलचक रांग लागली आहे. मंगळवारी सकाळी सुएझ बंदराच्या उत्तरेस कालवा ओलांडताना 400 मीटर लांबीचे आणि 59 मीटर रुंद असलेले हे जहाज अडकले. ते काढण्यासाठी टग बोट मोठ्या प्रमाणात तैनात केल्या गेल्या आहेत. टग बोट म्हणजे जहाजे पुश करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बोट. मात्र हे कंटेनर जहाज काढण्यास काही दिवस लागू शकते, असे अंदाज वर्तविले जात आहे. 193.3 किमी लांबीचा  सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राबरोबर जोडते. 

जहाजे जाम 

कंटेनर जहाज अडकल्यामुळे लाल समुद्र आणि भूमध्य समुद्राच्या कडेला मोठ्या प्रमाणात जहाजांचा जाम लागला आहे. दररोज हजारो छोटी मोठी जहाजे युरोपमधून आशिया आणि आशिया ते युरोपपर्यंत या कालव्यामार्गे जातात. त्यामुळे जास्त वेळ हे मार्ग  बंद राहल्याने त्रासदायक होऊ शकतो आणि जहाजांना पूर्ण आफ्रिका खंडला  फेरी मारून युरोपला जावे लागेल.

आशिया आणि युरोपला जोडणारा सुवेझ कालवा सध्या ठप्प झाल्याची माहिती मिळाली आहे

चक्रीवादळामुळे नियंत्रण गमावले 

एवर गिवेन कंटेनर जहाज हे पनामाचे जहाज आहे. हे जहाज 2018 मध्ये तयार केले गेले होते, जे तैवानच्या परिवहन कंपनी एव्हरग्रीन मरीनद्वारे चालविली जाते. कंटेनर जहाज चीनमधून मालवाहतूक केल्यानंतर नेदरलँड्सच्या पोर्ट रॉटरडॅमकडे जात होते आणि त्यांनी हिंद महासागरातून युरोपकडे जाण्यासाठी स्वेझ कालव्याचा मार्ग निवडला, परंतु मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 7 वाजून 40 मिनिटांनी हे जहाज सुएझ बंदराच्या उत्तरेस अडकले. अहवालानुसार, एवर गीवनच्या क्रूने नोंदवले की सुएझ कालवा ओलांडताना हवेच्या जोरदार प्रवाहामुळे जहाज फिरले.

संबंधित बातम्या