जुन्या मार्गावरच कार्निव्हलचा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पणजी:कार्निव्हलची मिरवणूक जुन्या म्हणजे बांदोडकर मार्गावरच असावी, असा आपला आग्रह आहे. कार्निव्हल समितीच्या अध्यक्षाने पर्यटन खात्याच्या बैठकीत हा मुद्दा मांडला आहे.पर्यटकांच्या दृष्टीने हाच मार्ग योग्य असल्याचे उत्तर आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नाला आज दिले.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या मंत्री आणि आमदारांच्या झालेल्या बैठकीनंतर मोन्सेरात यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.पणजीतील कार्निव्हल हा पर्यटकांच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.मिरामार ते दोना पावला रस्त्यावर कार्निव्हलसाठी येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत.जुन्या पद्धतीने बांदोडकर मार्गावर मिरवणूक घेतल्यास पर्यटकांना ते सोयीचे होते, त्याशिवाय आजूबाजूने येणाऱ्या लोकांनाही येण्या-जाण्यासाठी हे ठिकाण सोयीचे असते.कार्निव्हल समितीचे अध्यक्षांनी नुकत्याच पर्यटन खात्याने घेतेल्या बैठकीत जुन्या मार्गाचाच आग्रह धरला आहे. आपणही या मार्गाचा आग्रह धरत असून, हाच मार्ग कार्निव्हलसाठी योग्य असल्याचे मोन्सेरात म्हणाले.

कार्निव्हल मिरवणूक बांदोडकर मार्गावरच

संबंधित बातम्या