COVID-19 Goa: 24 तासात 1209 कोरोना रुग्ण; 9 दिवसांत कोरोनाचे 499 बळी

corona
corona

पणजी: राज्यात गेल्या 9 दिवसांत 18 हजार 335 कोरोनाबाधीत सापडले, तर तब्बल 499 कोरोनाबाधितांचा मृत्‍यू झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) व आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) हे वारंवार गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी, तसेच सुपरस्पेशालिटी इस्पितळ आणि इतर कोविड इस्पितळांना भेटी देऊन सर्व काही सुरळीत चालल्याचे सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. आज दिवसभरामध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या 31 जणांना आपला जीव गमवावा लागला. (1209 corona patients in 24 hours)

आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 3 हजार 873 जणांची कोरोणा तपासणी करण्यात आली . आज जे अहवाल जाहीर झाले आहेत त्यानुसार आज 1209 नवे कोरोना बाधीत सापडले .तर 2160 कोरोना बाधित आज बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये 31 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या  2228 एवढी झालेली आहे .आजच्या दिवशी राज्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 22,964 एवढी असून गेल्या चोवीस तासांमध्ये 139 व्यक्तींना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला.

तर 209 कोरोना बाधितांना कोरोना इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले. राज्यामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर  31. 21  टक्के असून कोरोना बाधित बरे होण्याची टक्केवारी  82.00 टक्के एवढी आहे. आज  ज्या 31 कोरोना बाधितांचे निधन झाले त्यातील  18 कोरोना  बाधित हे गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे उपचार घेत होते. तर दक्षिण गोवा जिल्हा  इस्पितळामध्ये उपचार घेणाऱ्या 12  कोरोना बाधितांचे आज निधन झाले आहे .उत्तर गोव्यातील खाजगी इस्पितळात कोरोनावर उपचार घेणारी एक व्यक्ती आज दगावली  आहे.

9 दिवसात 499 म्रुत्यू

राज्यात 11 मे ते 19 मे या काळात 18,335 नवे कोरोना बाधीत सापडले असून 499 कोरोना बाधीत मरण पावले आहेत.  नवे कोरोना बाधीत व म्रुत्यू 

तारीख कोरोना बाधीत मृत्यू
11/05/2021  3124   75
12/05/2021 2865 70
13/05/2021 2491   63  
14/05/2021 2455 63  
15/05/2021 1957   58
16/05/2021 1314 43
17/05/2021 1562 53
18/05/2021 1358 45
19/05/2021 1209 31 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com