गोव्यात दिवसभरात ५० रुग्ण कोरोनामुक्त

 50 patients corona free in a day
50 patients corona free in a day

पणजी: राज्यात आज कोरोनाचे राज्यात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ७३९ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ८५ लोकांना कोरोनाची लागण झाली तर ५० लोक कोरोनमुक्त झाले आहेत. आज ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये सांगे येथील ६६ वर्षीय पुरुष आणि पर्रा येथील ८४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हे दोन्ही मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील रिकव्हरी रेट ९६.७१ टक्के इतका आहे. राज्यभरात ९३९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज (गुरुवारी) ५० लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग उपचारासाठी स्वीकारला तर इस्पितळात उपचार करण्यासाठी ३० लोकांना भरती करून घेण्यात आले. १८२० इतक्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com