मेळावली आंदोलनकर्त्यांना पाठींबा देण्यासाठी पोलिस मुख्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांची धडक

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 7 जानेवारी 2021

आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर सायंकाळी शेळ मेळावलीत ग्रामस्थांची भेटीस आले आहे.

मेळावली: सत्तरी तालुक्यातील शेळ मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर सायंकाळी शेळ मेळावलीत ग्रामस्थांची भेटीस आले आहे. मेळावली येथील महिलावरील अत्याचार तसेच आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याच्या विरोधात पोलिस मुख्यालयावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक दिली.

त्यानंतर पोलिस महासंचालकांची भेट घेऊन आंदोलक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस नेते सत्तरीकडे रवाना होणार आहेत. शेळ मेळावलीतील आंदोलकांविरोधात सरकारने बळाचा वापर सुरु ठेवल्यास राज्यभरातील जनता तेथे पोचेल असा इशारा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिला होता.

कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत शेळ मेळावली येथे सुरू असलेल्या निषेधावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. बैठक संपल्यानंतर शेळ मेळावली ग्रामस्थांवरील एफआयआर मागे घेण्याची मागणी करण्यासाठी एक प्रतिनिधी डीजीपी सीना कुमार यांची  भेट घेणार आहे. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत हे ग्रामस्थांना भेटण्यासाठी शेळ मेळावली कडे जात आहेत.

आणखी वाचा:

गोवा मार्केट व्यापारी संघटनेचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना निवेदन -

संबंधित बातम्या