बँक संघटनेच्या संयुक्त मंचतर्फे पणजीत देशव्यापी धरणे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात व लोकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी काल बँक संघटनेच्या संयुक्त मंचतर्फे पणजीत आझाद मैदानावर धरणे धरण्यात आले.

पणजी: सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात व लोकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आज बँक संघटनेच्या संयुक्त मंचतर्फे पणजीत आझाद मैदानावर धरणे धरण्यात आले. देशव्यापी धरणे आज धरण्यात येत असल्याने गोव्यातूनही त्याला पाठिंबा देण्यात आला. सरकारने हा निर्णय पुढे नेण्याचा प्रयत्न केल्यास 15 व 16 मार्चला दोन दिवशीय देशव्यापी संप पुकारण्याचा इशारा मंचने दिला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून देशातील बँकांचे खासगीकरण करून त्याचा व्यवहार काही खासगी कंपन्यांच्या हाती देण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे. मात्र तसे झाल्यास बँकांतील खातेधारकांचे तसेच ठेवीधारकांचे पैसे सुरक्षित राहणार नाही. बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा हा प्रयत्न देशातील बँक संघटनेच्या संयुक्त मंचतर्फे तो सफल होऊ दिला जाणार नाही. या निर्णयामुळे बँकांची रक्कम ही खासगी कंपन्यांच्या हाती जाणार असून त्यावर त्यांचा अधिकार राहील. बँक कर्मचाऱ्यांवर अनेक निर्बंध येणार असून त्याचा परिणाम बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही होऊ शकतो. त्यामुळे देशपातळीवर सर्व बँकांनी संघटितपणे सरकारचा हा निर्णय हाणून पाडण्यात येईल असे मत गोव्यातील बँक संघटनेच्या संयुक्त मंचचे नेत्यांनी व्यक्त केले.

गोवा शिगमोत्सवाची तारीख जाहीर; पणजीतून होणार सुरुवात 

संबंधित बातम्या