Tauktae Cyclone Goa: समुद्रात अडकलेली नौका सुखरूप किनाऱ्यावर 

cyclone
cyclone

काल तौकते वादळाने (Tauktae Cyclone) गोवा आणि किनारपट्टी भागात धुमाकूळ घातला तेथील जनजीवन विस्कळीत झाले. आज वादळ गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरून मुंबई (Mumbai), गुजरात (Gujrat) किन्नरपट्टी कडे वळाले. वादळाच्या संभाव्य धोक्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका असे सांगण्यात आले होते. परंतू, तरीही काही मच्छिमारी नौका समुद्रात गेल्या होत्या. त्यातच एक नौका गोव्याच्या समुद्रात अडकली. या नौकेवरील खलाशांनी मदत मागितली त्यानंतर तटरक्षक दल मदतीला धावले. इंडियन कोस्ट गार्डच्या जहाजाने समुद्रातून 15 मच्छीमारांची सुखरूप सुटका केली. कोस्टगार्डने अतिशय सहजतेने हे ऑपरेशन पूर्ण केले. बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप असून बोटीला पाय लावून किनाऱ्यावर आणले गेले. तौकते वादळाने मुंबई, गुजरात किनापट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस आहे. (A boat stuck in the sea came ashore)

दरम्यान, राज्यातील तौकते चक्रीवादळामुळे होणाऱ्या परिणाम आणि विध्वंसांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी बातचीत केली असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. गृहमंत्र्यांनी चक्रीवादळामुळे होणाऱ्या व्यापक नुकसानीची माहिती घेतली आणि सामान्य स्थितीत परत येण्यासाठी सर्व केंद्रीय एजन्सींना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. काल सकाळीच तौकते वादळ गोवा किनारपट्टीला धडकले होते. केरळहून गोव्यात (Goa) सुमारे 147 कि. मी. वेगाने धडकलेल्या ‘तौकते’ (Cyclone Tauktae)चक्रीवादळाने राज्याला काल मोठा तडाखा देत हाहाःकार माजवला. दिवसभरात सोसाट्याचा वादळीवारा व धुवांधार पावासामुळे 500 हून अधिक मोठी व लहान झाडे उन्मळून पडली, तर 150 घरांवर झाडे पडून तसेच छप्पर उडून नुकसान झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com