गोव्यात आजही पावसाची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

22 आणि 23 मार्च 2021 रोजी गोव्यात वेगळ्या ठिकाणी तुरळक पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.

पणजी: 22 आणि 23 मार्च 2021 रोजी गोव्यात वेगळ्या ठिकाणी तुरळक पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. राज्यभरात ढगांचा गडगडाट दुपारनंतर ऐकू येत होता. मात्र बहुतेक भागात पावसाचे आगमन झाले नाही. मात्र ग्रामीण भागात काही प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद आहे.

Shigmotsava Festival 2021: गोव्यातील या तीन शहरात साजरा होणार शिमगोत्सव 

आगामी चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तापमानातही वाढ होण्याची शक्यता, हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या किनारी भागात, महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागामध्ये पाऊस पडला. त्याचबरोबर गोव्यामध्ये काही प्रमाणात शिडकावा झाला. गोव्यात समुद्राची पातळी वाढली. पुढील तिन ते चार दिवस हवेत उष्णता वाढणार आहे आणि संध्याकाळी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

संबंधित बातम्या