गोव्यातील मिरामार समुद्र किनाऱ्यावर कोरोनाच्या नियमांचे पालन न करता छठ पुजा साजरी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

संपूर्ण देशात सध्या कोरोना महामारीचे सावट असल्याने सरकार तसेच तज्ञांकडून जास्त गर्दी न करता साध्या पद्धतीने सण - उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले जात आहे.

पणजी :  संपूर्ण देशात सध्या कोरोना महामारीचे सावट असल्याने सरकार तसेच तज्ञांकडून जास्त गर्दी न करता साध्या पद्धतीने सण - उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले जात आहे. मागील दिवसांतील काही सण नागरिकांनी संयम पाळून साधेपणाने साजरे केले, परंतु देशावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट असतानाच काही उत्तर भारतीय बांधवांनी कसलेही नियम न पाळता छठ पुजा साजरी केली.

गोव्यातील मिरामार समुद्र किनाऱ्यावर छठ पुजा साजरी करताना उत्तर भारतीयांनी कोरोनासाठी घालण्यात आलेल्या कोणत्याही नियमांचे पालन केले नाही. देशातील इतर राज्यात कोविड महामारीमुळे छठ पुजा करण्यास बंदी असताना गोव्यातील समुद्र किनारेवर सुरक्षित अंतर न ठेवता  बिनधास्त साजरा करण्यात आला, यामुळे राज्यात कोरोना हळू हळू अटेक्यात येत असताना हे संकट पुन्हा वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.

अधिक वाचा : 

गोव्यात आजपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू

दिल्लीत लाखोंची चोरी करणाऱ्या तरूणांना गोव्यात अटक

संबंधित बातम्या