मुख्यमंत्र्यांनी वाहिली मृदुला सिन्हा यांना श्रद्धांजली

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्‍या पार्थिवाचे दर्शन घेऊन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तेथील पुस्तिकेत मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशही लिहिला.

पणजी :माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्‍या पार्थिवाचे दर्शन घेऊन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तेथील पुस्तिकेत मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशही लिहिला.

सिन्हा यांच्या पार्थिवावर आज दुपारी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री काल रात्रीच दिल्लीला रवाना झाले होते, आज सायंकाळी ते गोव्यात परतले. अंत्यसंस्कारावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संघटन सचिव बी. एल. संतोष यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली.

 या भेटीवेळी केवळ औपचारीक बोलणे झाले, इतर काही चर्चा झाली नाही. इतर चर्चेचे तेथे वातावरणही नव्हते, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा:

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार ; मुख्यमंत्री राहणार उपस्थित

 

संबंधित बातम्या