बार्देश तालुक्यात कोरोनाचा विस्फोट; तर डीचोली आणि काणकोणात परिस्थिती चिंताजनक

goa corona.jpg
goa corona.jpg

म्हापसा:  बार्देश तालुक्यात कोविड रुग्णांचा फैलाव वाढत असून बार्देश तालुक्यात ९७० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. म्हापसा शहरात ३४ रुग्णांची त्यात भर पडली आहे. यामध्ये एका कोविड रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त पर्वरी ३२६, कांदोळी २४०, म्हापसा १७९, शिवोली ११६, हळदोणे ६४, कोलवाळ ४५ असे सक्रिय रुग्ण आहेत. बार्देशमध्ये कोविडचा फैलाव रोखण्यासाठी प्रशानसला कडक पावले उचलण्याची गरज आहे. (Corona eruption in Bardesh taluka, while situation in Dicholi and Kankon is critical)

डिचोली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डिचोलीतही आता कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. मागील २४ तासांत  तालुक्यात एकूण २५ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे १३३ सक्रिय रुग्ण आहेत. मागील चोवीस तासांत डिचोली आरोग्य केंद्राच्या कार्य क्षेत्रात १६, मये आरोग्य केंद्राच्या कार्य क्षेत्रात ५, तर साखळी सामाजिक आरोग्य केंद्राच्या कार्य क्षेत्रात ४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डिचोली विभागात ६७, मये विभागात २७ आणि साखळी विभागात ३९ मिळून १३३ सक्रिय रुग्ण आहेत. पैकी १३० रुग्ण होम क्वॉरंटाईन, तर तीन रुग्णांवर कोविड इस्पितळात उपचार चालू आहेत.

काणकोणः काणकोणात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. काणकोणात ७ एप्रिल ते ८ एप्रिल या दोन दिवसांत काणकोणच्या  वेगवेगळ्या भागात १५ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. पैंगीण दोन, गालजीबाग पाच, पालिका क्षेत्रातील तेंबेवाडा येथे एक, कोळंब एक, तळपण एक, चाररस्ता एक, भगतवाडा एक, भाटपाल एक व पाटणे येथे एक कोरोना रुग्ण सापडला आहे. यापूर्वी १८ कोरोनाग्रस्त काणकोणात होते. सर्वाधिक रुग्ण तळपण व पालिका क्षेत्रात आहेत. काणकोणात सक्रिय रुग्णाची संख्या वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जत्रोत्सव व जत्रोत्सवातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेले दिवजोत्सव. सामाजिक अंतराचे भान न ठेवता यंदा काणकोणातील काही भागात पारंपरिक शिमगोत्सव व जत्रांचे आयोजन करण्यात आले. जत्रोत्सवाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या देवालयात दिवजोत्सवही साजरा करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com